मसुरे | प्रतिनिधी : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे NMMS विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. ऑगस्ट ते डिसेंबर असे ५ महिने Nimms विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू होते त्याचा येथे समारोप समारंभ करण्यात आला. यावेळी या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. काळसेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून वर्गाला नियमित उपस्थित राहिल्या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, ही परीक्षा अत्यंत महत्वाची असून विद्यार्थ्याना आर्थिक पाठबळ देणारी असून त्यादृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक परीक्षेला सामोरे जात यशस्वी व्हावे. किशोर शिरोडकर, धानजी चव्हाण, नेहा जांभवडेकर यानीही मुलांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
कृतिका लोहार, ईश्वरी पाताडे, गायत्री साळुंके व ओंकार या मुलानी सेवांगण, काळसेकर सर व पेडणेकर सर यांचे आभार मानले. या वर्गासाठी श्री. काळसेकर, तुकाराम पेडणेकर, बाळकृष्ण गोंधळी, नेहा जांभवडेकर यानी मेहनत घेतली.
या समारोप कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, जगदिश नलावडे, दीपक भोगटे, धानजी चव्हाण, बाळकृष्ण गोंधळी, काळसेकर सर नेहा जांभवडेकर पालक व विद्यार्थी उपस्थित होते.