मुणगे गावचे सुपुत्र प्रकाश लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ, मुणगे यांचे सादरीकरण.
मसुरे | प्रतिनिधी : कोकण एकता प्रतिष्ठान डोंबिवलीच्या माध्यमातून डोंबिवली रेल्वे मैदानावर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त १ डिसेंबर रोजी देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थिती चे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.