पोईप | प्रतिनिधी : राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत
कै. पांडुरंग सरनाईक जयंती निमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ५०० रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.
भारतीय स्वातंत्र्य एक क्रांती, आधुनिकीकरण व जागतिक प्रदूषण, विज्ञान मानवी जीवनासाठी वरदान की शाप, डिजिटल इंडिया आणि ग्रामीण भागातील सद्य परिस्थिती, असे आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सात मिनिटे वेळ मिळेल. सहाव्या मिनिटाला बझर होईल. प्रत्येक शाळेतून दोन स्पर्धक घेतले जातील.ही वक्तृत्व स्पर्धा आठवी,नववी व दहावी साठी मर्यादित आहे. अधिक माहिती साठी श्री विलास सरनाईक (९४०४४३६५७७), श्री केशव भोगले. (९४२०२१०६७९) या क्रमांकांवर संपर्क साधावा.