चिंदरच्या विशाल गोलतकर यांची रांगोळी प्रथम
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील आचरा येथील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा आचरा शाखेच्यावतीने दिनांक २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत दिवाळी निमित्त ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत आयोजन करण्यात आली होती. सदर स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ११०स्पर्धकांनी भाग घेतला. परिक्षण श्री. प्रकाश महाभोज यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाल गोलतकर चिंदर सडेवाडी, द्वितीय राम जाधव आचरा, नंदा भांडे बांदिवडे, उत्तेजनार्थ यशश्री गोसावी त्रिंबक यांना देण्यात आला.
यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.