30.5 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

तळेरे येथील आकाश कंदील स्पर्धेत कैवल्य भोगले, वरुची भोगले प्रथम.

- Advertisement -
- Advertisement -

दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञागंण यांचे आयोजन.

तळेरे | प्रतिनिधी : दिपावली २०२४ निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेत लहान गटात कैवल्य भोगले तर खुल्या गटात रुची भोगले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही स्पर्धा प्रज्ञागंण, तळेरे येथे संपन्न झाली.

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालय तसेच, प्रज्ञागंण दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी अजित कानेटकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, दिविजा वृद्धाश्रमाचे सायली तांबे, अश्विनी पटकारे, सतेज रणखांबे, ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, सौ. श्रावणी मदभावे, ग्रंथपाल सौ. साक्षी तळेकर, परीक्षक ऋचा तांबे, ऋतू महाडिक आदी उपस्थित होते.

आकाश कंदील स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
मोठा गट : (अनुक्रमे प्रथम तीन) – रुची भोगले, अंकिता बिद्रे, देवेश घुगरे तर लहान गटातून कैवल्य भोगले, धनिष्का तळेकर, मेधांश मदभावे.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मार्गदर्शक निकेत पावसकर म्हणाले की, गेली तीन वर्षे पर्यावरण पूरक, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे आणि सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे आकाश कंदील असा वेगळा विचार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली जाते. तो विचार समाजात रुजला पाहिजे, त्याची जाणीव जागृती झाली पाहिजे. आणि पुढील वर्षी अजून स्पर्धकांची संख्या वाढली पाहिजे तरच हा सामाजिक विचार पुढे जाईल.

या स्पर्धेला कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण ऋचा तांबे आणि ऋतू महाडिक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. श्रावणी मदभावे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रज्ञागणच्या रोशनी बागवे, सोहम सावंत, स्नेहल तळेकर, अंकिता शिंगे, दीक्षा धावडे, विक्रांत सावंत, प्रतिक भालेकर, श्रुती तळेकर, मनीषा परब, दीक्षा जाधव यांनी योगदान दिले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञागंण यांचे आयोजन.

तळेरे | प्रतिनिधी : दिपावली २०२४ निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेत लहान गटात कैवल्य भोगले तर खुल्या गटात रुची भोगले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही स्पर्धा प्रज्ञागंण, तळेरे येथे संपन्न झाली.

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालय तसेच, प्रज्ञागंण दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी अजित कानेटकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, दिविजा वृद्धाश्रमाचे सायली तांबे, अश्विनी पटकारे, सतेज रणखांबे, ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, सौ. श्रावणी मदभावे, ग्रंथपाल सौ. साक्षी तळेकर, परीक्षक ऋचा तांबे, ऋतू महाडिक आदी उपस्थित होते.

आकाश कंदील स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
मोठा गट : (अनुक्रमे प्रथम तीन) - रुची भोगले, अंकिता बिद्रे, देवेश घुगरे तर लहान गटातून कैवल्य भोगले, धनिष्का तळेकर, मेधांश मदभावे.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मार्गदर्शक निकेत पावसकर म्हणाले की, गेली तीन वर्षे पर्यावरण पूरक, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे आणि सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे आकाश कंदील असा वेगळा विचार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली जाते. तो विचार समाजात रुजला पाहिजे, त्याची जाणीव जागृती झाली पाहिजे. आणि पुढील वर्षी अजून स्पर्धकांची संख्या वाढली पाहिजे तरच हा सामाजिक विचार पुढे जाईल.

या स्पर्धेला कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण ऋचा तांबे आणि ऋतू महाडिक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. श्रावणी मदभावे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रज्ञागणच्या रोशनी बागवे, सोहम सावंत, स्नेहल तळेकर, अंकिता शिंगे, दीक्षा धावडे, विक्रांत सावंत, प्रतिक भालेकर, श्रुती तळेकर, मनीषा परब, दीक्षा जाधव यांनी योगदान दिले.

error: Content is protected !!