कुडाळ | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केलेल्या दत्ता सामंत यांचा कुडाळ शिवसेना शाखेत शिवसैनिकांनी सत्कार केला. यावेळी संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी चौके येथील राजा गावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, मालवण शहर प्रमुख भारती घारकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, अरविंद करलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख शिल्पा शिरसाट, सुशांत घाडीगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी राजा गावडे यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचे शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन केले.