मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगांच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. १४ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये कुमारी अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये कुमारी ईशा गणेश सुर्वे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये मुलांच्या गोळा फेक स्पर्धेमध्ये शुभम बाबाजी हडकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. ओझर विद्यामंदिरचे हे यशस्वी विद्यार्थी डेरवण,तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.
ओझर विद्यामंदिरच्या या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रवीण पारकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे मुख्याध्यापक डि. डि जाधव, शिक्षक, प्रशाला व संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.