28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा दसरोत्सव पारंपारिक उत्साहात.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : ऐतिहासिक वारसा असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री.देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव शनिवारी शाही थाटात, भाविकांच्या अलोट गर्दीत पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. श्री पावणाई देवालयात ढोल-ताशा वाजवून इशारत करण्यात आली. यावेळी बारा – पाच मानकरी, ग्रामस्थ, देवसेवक व भक्तगण मंदिरात जमा झाल्यानंतर वस्त्राभूषणांनी सजविलेले देवतरंग ( शिवकळा) काढण्यात आल्याव शिवकळेकडून सिमोल्लंघनाचा हुकूम घेण्यात आला. ढोल – ताशाच्या गजरात, फटक्याच्या आतषबाजीत, हर हर महादेवच्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लवाजम्यासह बारा – पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सिमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे गेले. या मंदिरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आपट्याचे झाड आहे. तिथे गेल्यावर त्या आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आपट्याच्या झाडाची पाने ( सोने) म्हणून लुटण्यात आली. त्यानंतर ही देवता परत येताना चौ-याऐंशीच्या चाळ्याला भेट देऊन नंतर रिवाजाप्रमाणे श्री गांगेश्वर – विठ्ठलाई देवीला भेटली. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी पावणाई व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून त्या देवतांची भेट झाली. त्या नंतर देवता पापडीवर गेल्यावर भक्तानी देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतले.

या सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती. देवीची ओटी भरण्यासाठी व देवदर्शनासाठी माहेरवाशीणी आल्या तर चाकरमानींचीही उपस्थिती होती. शिरगांव दशक्रोशीतील असंख्य भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : ऐतिहासिक वारसा असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री.देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव शनिवारी शाही थाटात, भाविकांच्या अलोट गर्दीत पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. श्री पावणाई देवालयात ढोल-ताशा वाजवून इशारत करण्यात आली. यावेळी बारा - पाच मानकरी, ग्रामस्थ, देवसेवक व भक्तगण मंदिरात जमा झाल्यानंतर वस्त्राभूषणांनी सजविलेले देवतरंग ( शिवकळा) काढण्यात आल्याव शिवकळेकडून सिमोल्लंघनाचा हुकूम घेण्यात आला. ढोल - ताशाच्या गजरात, फटक्याच्या आतषबाजीत, हर हर महादेवच्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लवाजम्यासह बारा - पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सिमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे गेले. या मंदिरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आपट्याचे झाड आहे. तिथे गेल्यावर त्या आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आपट्याच्या झाडाची पाने ( सोने) म्हणून लुटण्यात आली. त्यानंतर ही देवता परत येताना चौ-याऐंशीच्या चाळ्याला भेट देऊन नंतर रिवाजाप्रमाणे श्री गांगेश्वर - विठ्ठलाई देवीला भेटली. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी पावणाई व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून त्या देवतांची भेट झाली. त्या नंतर देवता पापडीवर गेल्यावर भक्तानी देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतले.

या सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती. देवीची ओटी भरण्यासाठी व देवदर्शनासाठी माहेरवाशीणी आल्या तर चाकरमानींचीही उपस्थिती होती. शिरगांव दशक्रोशीतील असंख्य भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.

error: Content is protected !!