मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या वतीने उद्योगपती दिवंगत रतन रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. १० ऑक्टोबर रोजी श्री. जयंती मंदिर येथे पळसंब गावाच्या वतीने रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी पळसंब गावातील महिला, युवक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंबचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार वैभव परब शेखर, पुजारे, अमित पुजारे, बबन पुजारे, अक्षय परब, रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, हितेश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पळसंब मधील समाज अभ्यासक व सुप्रसिद्ध निवेदक प्रमोद सावंत म्हणाले की अखंड प्रजासत्ताक भारत देशाचे आधुनिक कर्ण आज आपल्यातुन निघुन गेले. देशाचे औद्योगीकरण व प्रगतीशीलता या सर्व गोष्टीत आदरणीय टाटा यांचा फार मोठा वाटा आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत म्हणाले की जगातल्या अनेक महासत्ता असलेल्या देशानी कोरोना काळ दिवंगत रतन टाटा यांच्या औदार्य ल सामर्थ्याने अनुभवला परंतु आधुनिक युगात असा. कोणीही दानशुर कर्ण झाला नाही. ते कर्ण रतन टाटा आपलेच होते हे आपले सर्व भारतीयांचे अहोभाग्य आहे.
पळसंबचे माजी सरपंच व मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत गोलतकर म्हणाले की रतन टाटा यांनी आपल्यावर व आपल्या देशावर अनेक उपकार केले आहेत त्याची परत फेड आपण करूच शकत नाही हे तितकेच त्रिवार सत्य आहे. अशा या थोर आधुनिक कर्णाला माझा मानाचा मुजरा व अखेरचा सलाम.