गोवा बनावटी दारूसह ८,५७,००० हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत
कणकवली | उमेश परब : कासार्डे विजयदुर्ग फाटयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध दारू वाहतुक करत असलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो ताब्यात घेतला असून गोवा बनावटीच्या मद्याची ४,५७,०००/-किमतीची दारू पकडली आहे.तसेच सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर) याला अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ९ .३० च्या दरम्यान कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचण्यात आला.दोन पंच आणि स्टाफसह खाजगी वाहने तैनात करण्यात आली.कणकवली कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचला असता येणाऱ्या वाहन बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – 12 / KP 8533 हे थांबवून तपासणी केली या वाहनाच्या मागील दरवाज्यावर सील लावलेले होते . आतील मालाची बिल्टी वाहनामध्ये नव्हती . त्यामुळे अधिक संशय आल्याने तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याचे गोवा बनावटीचे १०१ बॉक्स व ५ बिअरचे बॉक्स असे एकूण १०६ बॉक्स मिळून आले . या गोवा बनावटीच्या मद्याची किंमत ४,५७,००० / एवढी आहे . दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेल्या बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – १२ / KP ८५५३ सापडला . सदर मिळून आलेले १०६ बॉक्स व बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MII १२ / KP – ८५५३ व रु ८,५७,००० / – किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला . सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर) यांला अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे . वाहतूककामी वापरण्यात आलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेला आहे . गेल्या आठवडाभरातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही दुसरी धडक आहे. कारवाई सदरील कारवाई अधीक्षक डॉ . बी . एच . तडवी यांच्या मागदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव यांनी कारवाई केली . सदर कारवाईमध्ये सहाय्यक दुय्यम निरीक्षकजी . एल . राणे ल , सुरज चौधरी , जे . आर . चव्हाण , श्रीमती स्नेहल कुवेसकर यांनी मदत केली . साजीद शहा , खान यांनी मदत केली . पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव आहेत .