कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग देवगड – निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी प्रवासी शेड येथील धोकादायक वळणावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. काही महिन्यांपूर्व बस व कारचा अपघात झाला होता. त्यामुळे हे धोकादायक वळण कमी करण्यात यावे आणि तातडीने या वळणावरील वाढलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवावी , अशी मागणी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके व ग्रामस्थांनी केली आहे.
देवगड निपाणी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे
दरम्यान असलदे गावामध्ये डामरेवाडी येथील वळणावर शनिवारी सायंकाळी कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात होणार होता. सुदैवाने दुचाकी चालकाने प्रसंग लक्षात येताच आपली दुचाकी रस्त्याच्या बाहेर घेतल्याने अपघात टळला . त्यामुळे या धोकादायक वळणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करत वळणावर रुंदीकरण व वाढलेल्या झाडीची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.