बांदा | राकेश परब : बांद्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खास दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत शिवानंद संतोष परब याने साकारलेली किल्ले सिंधुदुर्गची प्रतिकृती प्रथम परितोषिकाची मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
जितेंद्र रघुनाथराम चौधरी (पन्हाळगड) व अरविंद आशुतोष भांगले (किल्ले पुरंदर) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. माधव सुधाकर डेगवेकर व कार्तिक सचिन मालवणकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण प्रसाद राणे व अच्युत पिळणकर यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सलग चौथ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार दिनांकन १४ रोजी सायंकाळी ६ वाजता कट्टा कॉर्नर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान व कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.