देहदान व नेत्रदान विषयक माहिती आणि नोंदणी मोहीमेचा विशेष कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते, मालवण यांच्यावतीने मंगळवार १ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा तसेच देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहीम असे उपक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. डॉ. विदयाधर तायशेट्ये, फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बाॅडी डोनेशन’ चे प्रमुख समन्वयक यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. मंगळवारी १ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ०० ते २. ०० दरम्यान मामा वरेरकर सभागृह मालवण येथे हे उपक्रम संपन्न होतील.
देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहीम मार्गदर्शन व नाव नोंदणी यासाठी डॉ. श्री. प्रमोद विनायक लिमये. (जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ३५ वर्षे आरोग्य विभाग येथे सेवा निवृत्त देहदान अवयव दान कार्यक्रमात गेली ७ वर्षे कार्यरत.) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
देहदान, नेत्रदान यांच्या नोंदणी फाॅर्मसाठी इच्छुकांनी आपले आधारकार्ड घेऊन येणे आणि आरोग्य कार्यात सहभागी होण्याचे आवाहन लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते गोवा, ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांनी केले आहे.