मळगांव | नितिन गावडे : रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्य श्री. सगुण माळकर, मा. श्री. पराग सावंत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. अस्मिता कुंभार, सौ. वैदेही घारे, प्रभारी मुख्याध्यापक श्री संदीप तुळसकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य, झांज पथक, मनोरे, एरोबिक्स नृत्य अशी विविध नृत्ये सादर केली. त्यानंतर विद्यालयातून कुंभारटेंब ते जैतिर मंदिर अशी मिरवणुक काढण्यात आली. ग्रामस्थांनी अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. कुंभार टेंब आणि जैतिर मंदिर येथे विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य सादरीकरण केले. ग्रामस्थ व उपस्थितांनी विद्यार्थी विद्यार्थीनींची प्रशंसा केली.