कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या अभिनवनगर येथील सौरभ गवंडे हा भारतातील संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल ठरला आहे. सौरभ याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण कुडाळ येथील पडतेवाडी प्राथमिक शाळेत, तर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण येथीलच कुडाळ हायस्कूल येथे झाले असून त्यानंतर त्याने व्हीजेटीआय ( मुंबई) येथे बी – टेक (सिव्हिल इंजिनीअर्स) पूर्ण केले. सध्या तो चंदीगड येथे इंडीयन ऑईल कंपनीत ग्रेड ए अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
युपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा २९२३ परीक्षेत देशात १७ वा, तर महाराष्ट्रात पाहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल सिंधुदुर्गसह राज्यभरातून त्याची प्रशंसा होत आहे. सौरभ हा कोकण रेल्वेचे सिग्नल इंजिनियर संदीप गवंडे व सेवानिवृत्त पोस्टल असिस्टंट सुषमा गवंडे यांचा मुलगा आहे.