30.1 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

कणकवलीत ज्येष्ठ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.

- Advertisement -
- Advertisement -

२० हजार रुपयांनी भरलेले पाकीट केले संबंधिताच्या स्वाधीन.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवलीतील रिक्षाचालकांच्या मेहनतीची व प्रामाणिकपणाची नेहमीच प्रशंसा होत असते. त्याचा पुन:प्रत्यय येणारी एक घटना कणकवलीत घडली आहे. प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांना, कणकवलीत – नरडवे मार्गावरील एका हॉस्पिटल समोरील गतिरोधकाजवळ पैशाने भरलेले एक पाकीट पडलेले आढळले. हे पाकीट रिक्षाचालक गावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आतील ओळखपत्र तपासले असता तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी खाडे यांचे ते ओळखपत्र त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत कणकवलीतील रहिवासी असलेले व महसूल कर्मचारी अरुण जोगळे यांच्याशी संपर्क साधला व पाकिटात असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधत पाकिटाचे मूळ मालक संभाजी खाडे यांना हे पाकीट परत केले. रिक्षाचालक गावडे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री प्रवीण गावडे हे कणकवली रेल्वे स्टेशन येथे रिक्षा व्यवसाय करतात.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. संभाजी खाडे यांनी देखील या रिक्षा चालकाची प्रशंसा केली व कृतज्ञता व्यक्त केली.

फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२० हजार रुपयांनी भरलेले पाकीट केले संबंधिताच्या स्वाधीन.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवलीतील रिक्षाचालकांच्या मेहनतीची व प्रामाणिकपणाची नेहमीच प्रशंसा होत असते. त्याचा पुन:प्रत्यय येणारी एक घटना कणकवलीत घडली आहे. प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांना, कणकवलीत - नरडवे मार्गावरील एका हॉस्पिटल समोरील गतिरोधकाजवळ पैशाने भरलेले एक पाकीट पडलेले आढळले. हे पाकीट रिक्षाचालक गावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आतील ओळखपत्र तपासले असता तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी खाडे यांचे ते ओळखपत्र त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत कणकवलीतील रहिवासी असलेले व महसूल कर्मचारी अरुण जोगळे यांच्याशी संपर्क साधला व पाकिटात असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधत पाकिटाचे मूळ मालक संभाजी खाडे यांना हे पाकीट परत केले. रिक्षाचालक गावडे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री प्रवीण गावडे हे कणकवली रेल्वे स्टेशन येथे रिक्षा व्यवसाय करतात.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. संभाजी खाडे यांनी देखील या रिक्षा चालकाची प्रशंसा केली व कृतज्ञता व्यक्त केली.

फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो

error: Content is protected !!