आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावठणवाडी महसूल गांव पोलीस पाटील पदी चिन्मयी चंद्रशेखर पाताडे यांची तर अपराजवाडी महसूल गाव पोलीस पाटील पदी समृद्धी सर्वेश अपराज यांची नुकतीच निवड करण्यात आली.

चिन्मयी पाताडे
चिन्मयी पाताडे यांची गावठणवाडी महसूल मधून खुल्या प्रवार्गातून तर समृद्धी अपराज यांची अराखीव महिला प्रवार्गातून नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयातून नुकतेच त्यांना कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या सहिचे पत्र प्राप्त झाले आहे.

समृद्धी अपराज
हि पोलीस पाटील निवड २७ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २९२९अशी पाच वर्षा पर्यंत असून त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.