26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बिएमडब्ल्यू कारने उडवलं ; एक ठार तर एकाची प्रकृती गंभीर.

- Advertisement -
- Advertisement -

चालक फरार…!

मुंबई | ब्युरो न्यूज : ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मुलुंडमध्ये पहाटे ४ वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाने तिथून पोबारा केल्याचे वृत्त आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने तो पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झालं असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

फोटो सौजन्य | मुंबई ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चालक फरार…!

मुंबई | ब्युरो न्यूज : ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मुलुंडमध्ये पहाटे ४ वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाने तिथून पोबारा केल्याचे वृत्त आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने तो पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झालं असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

फोटो सौजन्य | मुंबई ब्युरो

error: Content is protected !!