26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आता चालू नाही केले तर…..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब ( सहसंपादक) असनिये व घारपी या गावांमध्ये टॉवर उभे करून रंगरंगोटी पूर्ण करून गेले वर्षभर दोन्ही टॉवर तसेच उभे करून ठेवले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील भारत संचार निगम कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर आज भाजपाचे पदाधिकारी श्री गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी आज बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयाला धडक दिली.भारत संचार निगमचे विभागीय अभियंता श्री प्रकाश गंगावती यांना जाब विचारला व सप्टेंबर अखेरपर्यंत सदर दोन्ही टॉवर कार्यान्वित करण्यास सांगितले.सप्टेंबर महिना अखेरपर्यंत दोन्ही टॉवर कार्यान्वित न झाल्यास भारत संचार निगमच्या सावंतवाडी कार्यालयाच्या गेट समोर दोन्ही गावातील ग्रामस्थ धरणे आंदोलनास बसणार असल्याचा इशारा देखील दिला. कार्यकर्ते व ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून बीएसएनएल अधिकारी प्रकाश गंगावती यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराला संपर्क करत त्याला महिन्याभरात टॉवर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

यावेळी गुरु कल्याणकर यांच्यासोबत भाजपा कार्यकर्ते संजय सावंत,दिलीप सावंत,शरद सावंत, चंद्रकांत भिसे,शिवराम गावडे,हरी गावडे,हेमंत दाभोलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब ( सहसंपादक) असनिये व घारपी या गावांमध्ये टॉवर उभे करून रंगरंगोटी पूर्ण करून गेले वर्षभर दोन्ही टॉवर तसेच उभे करून ठेवले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील भारत संचार निगम कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर आज भाजपाचे पदाधिकारी श्री गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी आज बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयाला धडक दिली.भारत संचार निगमचे विभागीय अभियंता श्री प्रकाश गंगावती यांना जाब विचारला व सप्टेंबर अखेरपर्यंत सदर दोन्ही टॉवर कार्यान्वित करण्यास सांगितले.सप्टेंबर महिना अखेरपर्यंत दोन्ही टॉवर कार्यान्वित न झाल्यास भारत संचार निगमच्या सावंतवाडी कार्यालयाच्या गेट समोर दोन्ही गावातील ग्रामस्थ धरणे आंदोलनास बसणार असल्याचा इशारा देखील दिला. कार्यकर्ते व ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून बीएसएनएल अधिकारी प्रकाश गंगावती यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराला संपर्क करत त्याला महिन्याभरात टॉवर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

यावेळी गुरु कल्याणकर यांच्यासोबत भाजपा कार्यकर्ते संजय सावंत,दिलीप सावंत,शरद सावंत, चंद्रकांत भिसे,शिवराम गावडे,हरी गावडे,हेमंत दाभोलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!