बांदा | राकेश परब : सध्या बांदा शहरात सातत्याने डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान आणि ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात धड़क देत स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. श्री गणेश चतुर्थी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने साथीच्या रोगाच्या पार्श्रभूमीवर आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्यात असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी श्री रियाज खान यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याशी चर्चा केली.
श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर औषध साठा किती शिल्लक आहे. बाहेरून येणाच्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी बसस्थानक, पोलीस तपासरणी नाका येथे आरोग्य पथक तैनात करण्यातबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी विवेक गवस, प्रसाद परब, विजय बांदेकर, संजय गावडे, दत्ताराम बांदेकर, पियूष बेळगावकर आदी उपस्थित होते.