मालवण : मालवण व्यापार क्षेत्रातील व्यापारी, हॉटेलव्यवसायिक, रिक्षा व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी निषेध नोंदविण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. तसेच मालवण वासियांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखली. या सर्वांचे युवा व्यापारी मंदार ओरसकर यांनी आभार मानले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष असलेला किल्ले सिंधुदुर्ग स्थापत्य शास्त्राचा आदर्श आहे. मालवणच्या जडणघाडणीत किल्ले सिंधुदुर्गचे स्थान शिखरावर आहे. मालवणाचे पर्यटन गेल्या काही वर्षात फार मोठया प्रमाणात वाढत असून पर्यटनाचा केंद्रबिंदू किल्ले सिंधुदुर्ग आहे. या सोबत गतवर्षी किल्ले राजकोट येथे उभारणी झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणच्या ऐतिहासिक पर्यटनातशिवाजी महाराज सर्वांसाठी दैवत आहेत. असे असताना महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना तमाम शिवप्रेमींसाठी दुःखदायक वेदनादाई आहे. मालवणवासियांना हा धक्का आहे
. मालवणच्या पर्यटनाचे नाव ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक स्तरावर पोहचले त्या महाराजांचा पुतळा मालवण भूमीतच कोसळतो ही घटना दुर्दैवी ठरली. दोषींवर कारवाई होईल, मात्र या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया या मंदार ओरसकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने मालवण व्यापार क्षेत्रातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, रिक्षा व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी निषेध नोंदविण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. तसेच मालवण वासियांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखली. या सर्वांचे युवा व्यापारी मंदार ओरसकर यांनी आभार मानले