मुलांसह मुलींनी थर लावत फोडली दही हंडी
मसुरे |
मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दहीहंडी फोडत असताना लैंगिक अत्याचारा विरुद्धची जनजागृती व स्त्री -पुरुष समानतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. तसेच नर्सरी, ज्युनिअर केजी च्या मुलांनी केलेल्या वेशभूषा आणि प्रशालेमध्ये साकारलेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा देखावा आकर्षक ठरला.
संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कूल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी पार्वती कोदे, रेश्मा बोरकर, सायली म्हाडगूत, स्टेला लोबो, समीर गोसावी, स्वरांजली ठाकूर, विभावरी पराडकर, श्रुतिका लाड, तनुश्री नाबर, रसिका मेस्त्री, काव्या देऊलकर , गौतमी प्रभूगावकर, सविता मेस्त्री तसेच कर्मचारी समीर सावंत, वसंत प्रभूगावकर, प्रिया पाटकर, स्वरा चव्हाण संतोष सावंत, अमोल परब उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.