बांदा | राकेश परब : श्रीदेवी माऊली मंदिर रोणापाल येथे दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भर्क्तीमय वातावरणात संपन्न झाला. देवदीपावलीला हा कार्यक्रम सादरा केला जातो. यावेळी रोणापाल गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने श्री. देवी माऊली मंदिर परिसरात दिप प्रज्वलीत केले. यावेळी शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून निघाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची
सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, सदस्य, मान्यवर तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे
उद्वाटन झाले. या दीपोत्सवाच्या निमित्ताने सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. यामध्ये कुमारी श्रद्धा देऊलकर कु. संजना गोठसकर कु. चित्रा नाईक यांचा सहभाग होता. पणत्यांच्या आरतीने या दिपोत्सव ची सांगता करण्यात आली.