देवगड |
बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व कोलकत्ता येथील एक महिला डॉक्टर वरील अत्याचार व या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने देवगड तालुका इंडिया महाविकास आघाडी यांच्या वतीने देवगड येथे काळ्या फीत लावून व काळ्या फितीने तोंड बंद करून शांततेच्या मार्गाने काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली व या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय .न्यायालयाचा मान राखून हा बंद मागे घेण्यात येऊन काळ्या फिती लावून काळ्या फितीने तोंड बंद करून निदर्शने करण्यात येत आहे असे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते नंदकुमार घाटे,तालुका प्रमुख जयेश नर,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव,भारतीय काँग्रेस अध्यक्ष उमेश कुळकर्णी युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर,तालुका अध्यक्ष सुरज घाडी,,महिला आघाडी तालुका प्रमुख हर्षा ठाकूर,सायली घाडीगांवकर,श्रुती करंदीकर,माधुरी ठुकरुल,विक्रांत नाईक,विजय कुळकर,योगेश गोळम वेदांग करंदीकर , बाळा कणेरकर,नगरसेवक निवृत्ती तारी, विशाल मांजरेकर, नितीन बांदेकर,भारतीय काँग्रेसचे सजाउद्दीन सोलकर,तुषार भाबल,रामदास कोठारकर उपस्थित होते.