31.2 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

बदलापूर अत्याचार प्रकरणी मालवणात आत्मक्लेश आंदोलन..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण : बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने फोवकांडा पिंपळ इथे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला, विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला.महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको… सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या. यावेळी पदाधिकारी पूनम चव्हाण, दीपा शिंदे, सेजल परब, निनाक्षी मेथर, सूर्वी लोणे,माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, रूपा कुडाळकर, रविना लुडबे, लक्ष्मी शिरसेकर, भारती आडकर आदी व इतर महिला आघाडी व युवतीसेनेच्या कार्यकर्त्या आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, अमेय देसाई, संमेश परब, नरेश हुले, मोंडकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण : बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने फोवकांडा पिंपळ इथे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला, विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला.महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको... सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या. यावेळी पदाधिकारी पूनम चव्हाण, दीपा शिंदे, सेजल परब, निनाक्षी मेथर, सूर्वी लोणे,माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, रूपा कुडाळकर, रविना लुडबे, लक्ष्मी शिरसेकर, भारती आडकर आदी व इतर महिला आघाडी व युवतीसेनेच्या कार्यकर्त्या आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, अमेय देसाई, संमेश परब, नरेश हुले, मोंडकर उपस्थित होते.

error: Content is protected !!