26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

काळसेत तुटलेल्या वीज वाहिनीमुळे महिलेचा दुर्दैवी अंत..!

- Advertisement -
- Advertisement -

चौके | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीकामासाठी जाणाऱ्या श्रीमती अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे यांचा पायवाटेवर तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेवर पाय पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अनिता कुडाळकर यांना घरी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मुलगा भूषण हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता दुर्घटना त्याच्या निदर्शनास आली.

वाडीतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, अनुष्का हेरेकर, नाना खोत, बाळू खोत, भाऊ नार्वेकर, श्रीकांत जावकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि वीज वितरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन आबा परब,कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी प्रकाश मोरे आणि सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान वीज वितरणच्या गलथान कारभारा विरोधात बागबाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत वीज वितरण अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरुन हलवू देणार नाही. अशी भूमिका घेण्यात आली. दुर्घटनेला सर्वस्वी वीज वितरण जबाबदार आहे. वीज तारावर स्पेसर, गार्डर नसल्यामुळे ही दुर्घटना घडली त्यामुळे वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्राण गेला आहे. असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.

बागवाडीतील कमकुवत विज तारांबद्दल तसेच खाली आलेल्या तारांबद्दल चार महिने अगोदर पासून ग्रामस्थ मागणी करत होते. तसेच २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ अभियंता अर्जुन भिसे यांना प्रत्यक्ष भेटून वीज वितरणच्या विद्युत लाईनच्या दुरुस्तीसाठी मागणी बागवाडी ग्रामस्थ यांनी केली होती, असे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चौके | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीकामासाठी जाणाऱ्या श्रीमती अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे यांचा पायवाटेवर तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेवर पाय पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अनिता कुडाळकर यांना घरी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मुलगा भूषण हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता दुर्घटना त्याच्या निदर्शनास आली.

वाडीतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, अनुष्का हेरेकर, नाना खोत, बाळू खोत, भाऊ नार्वेकर, श्रीकांत जावकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि वीज वितरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन आबा परब,कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी प्रकाश मोरे आणि सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान वीज वितरणच्या गलथान कारभारा विरोधात बागबाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत वीज वितरण अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरुन हलवू देणार नाही. अशी भूमिका घेण्यात आली. दुर्घटनेला सर्वस्वी वीज वितरण जबाबदार आहे. वीज तारावर स्पेसर, गार्डर नसल्यामुळे ही दुर्घटना घडली त्यामुळे वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्राण गेला आहे. असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.

बागवाडीतील कमकुवत विज तारांबद्दल तसेच खाली आलेल्या तारांबद्दल चार महिने अगोदर पासून ग्रामस्थ मागणी करत होते. तसेच २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ अभियंता अर्जुन भिसे यांना प्रत्यक्ष भेटून वीज वितरणच्या विद्युत लाईनच्या दुरुस्तीसाठी मागणी बागवाडी ग्रामस्थ यांनी केली होती, असे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.

error: Content is protected !!