29.3 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | राकेश परब : दिनांक १६ ऑगस्टपासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन झाले. ही यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील गावा गावातून जाणार आहे. दरम्यान दिनांक १९ ऑगस्ट रोजी पक्षाचे पदाधिकारी, सावंतवाडी शहर कार्याध्यक्ष राकेश नेवगी यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यामुळे १९ व २० ऑगस्ट रोजी यात्रा थांबविण्यात आलेली आहे. तसेच सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारा दिवसांचा दुखावटा पाळण्यात येणार आहे.

सावंतवाडी तालुका व शहरातील नियोजित कार्यक्रम आणि यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. बदल करण्यात आलेल्या तारखा नंतर कळविण्यात येणार असून फक्त दोडामार्ग तालुक्यातील नियोजन झालेले कार्यक्रमच होणार आहेत.

नेवगी कुटुंबीयांच्यावर या आकस्मित घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहोत असा शोक पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | राकेश परब : दिनांक १६ ऑगस्टपासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन झाले. ही यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील गावा गावातून जाणार आहे. दरम्यान दिनांक १९ ऑगस्ट रोजी पक्षाचे पदाधिकारी, सावंतवाडी शहर कार्याध्यक्ष राकेश नेवगी यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यामुळे १९ व २० ऑगस्ट रोजी यात्रा थांबविण्यात आलेली आहे. तसेच सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारा दिवसांचा दुखावटा पाळण्यात येणार आहे.

सावंतवाडी तालुका व शहरातील नियोजित कार्यक्रम आणि यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. बदल करण्यात आलेल्या तारखा नंतर कळविण्यात येणार असून फक्त दोडामार्ग तालुक्यातील नियोजन झालेले कार्यक्रमच होणार आहेत.

नेवगी कुटुंबीयांच्यावर या आकस्मित घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहोत असा शोक पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!