17 नोव्हेंबर रोजी भजन डबलबारी सामना…
चिंदर | विवेक परब : नाथगोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांचा त्रैवार्षिक कार्यक्रम उद्या १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. तसेच बुधवार १७ नोव्हेंबरला सत्यनारायण महापूजेनिमित्त २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा गुडूं सावंत(हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे-कुडाळ) तबला साथ- विवेक कदम, पख़वाज-विराज बांवकर व बुवा संदिप लोके(वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ-देवगड), तबला-संदेश सुतार, पख़वाज-योगेश सामंत यांच्यात होणार आहे. त्रैवार्षिक कार्यक्रम व डबलबारी जंगी सामना यांचा लाभ घेण्याचे आवाहन नाथ गोसावी युवक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष योगेश गोसावी व सेक्रेटरी मंगेश गोसावी यांनी सांगितले आहे.