हडी जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने गुणवंत गौरव सोहळा दिमाखात संपन्न
मसूरे (प्रतिनिधी )
हडी जेष्ठ नागरिक संघाने सर्व गुणवंतांचा गौरव करणारा चांगला कार्यक्रम राबविला आहे. विध्यार्थ्यानी चांगले गुण आत्मसात करावे. आपल्या गावाचे नाव रोशन होईल असे काम करा. बालवयातच मोठी स्वप्ने पाहून ही स्वप्ने पूर्ण होण्यासाठी स्वप्नांचा पाठलाग करा ! यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. करियर मार्गदर्शन कार्यक्रम राबविल्यास आपले पूर्ण सहकार्य लाभेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गीरसागर यांनी येथे केले.
फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील पहिली ते पदवी तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रकाश तोंडवळकर, संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे, माजी मुख्याध्यापिका सौ मेघना जोशी, प्रताप खोत, उपाध्यक्ष आरती कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, निवृत्त समाजकल्याण अधिकारी शामसुंदर पेडणेकर, शिवसेना ठाकरेगट तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, सुरेश भोजने, सोनाली कदम, सौ गोसावी, सल्लागार चंद्रकांत पाटकर, उमेश हडकर तसेच मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत अध्यक्ष देविदास सुर्वे यानी केले. यावेळी सुमारे 90 विधार्थ्यांना गौरविण्यात आले. सुरेश भोजने यांनी रोख रकमेची पारितोषिके आईच्या स्मरणार्थ दिली. यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याचे आवाहन केले. हरी खोबरेकर म्हणाले, विध्यार्थ्यानी चांगले यश प्राप्त करण्याठी कठोर मेहनत करावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून तुमच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातील. सौ मेघना जोशी म्हणाल्या, हडी गावातील विध्यार्थ्यांचा सन्मान करणारा हा जेष्ठ नागरिक संघ कौतुकास पात्र आहे. आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करा जे चांगल असेल म्हणजे तुमचं नाव होईल.ओझर हायस्कुल माजी मुख्याध्यापक खोत सर म्हणाले, आयुष्यात अनेक चढ उतार येतील पण समतोल राखून आयुष्यात यशस्वी व्हा. संघांचे सर्वच क्षेत्रात मोठे कार्य आहे.शामसुंदर पेडणेकर यांनी मोठ्या यशस्वी व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले. श्री सुरेश भोजने म्हणाले, मोबाइलचा वापर जरुरी प्रमाणे करा. भविष्यात आव्हाना सामोरे जाताना आत्मविश्वास कायम ठेवा. यावेळी उपसचिव भालचंद्र सुतार, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, कोषध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, महादेव सुर्वे, दिनकर सुर्वे, सत्यवान सुर्वे, प्रभाकर कांदळगावकर, रमेश कावले, अनंत घाडी, जानु कदम, सौ सीमा शेटये, राधाबाई कांबळी, सौ प्रज्ञा तोंडवळकर, प्रभाकर चिंदरकर, सुप्रिया वेंगुर्लेकर, वनिता हडकर, शांताराम साळकर, उमेश हडकर, गणू परब, गुरुनाथ गावकर, सदानंद शेडगे, आरती गावकर, सोमाजी कदम, गोसावी मॅडम आदी उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने 60 विध्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत पाटकर व आभार सुभाष वेगुर्लेकर यांनी मानले.