25.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवानिमित्त २० नोव्हेंबरला वेंगुर्ल्यात कार्यशाळा..

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | विवेक परब : कला व सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा मुंबई येथील “प्रबोधन गोरेगांव” या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील लघुपट निर्मात्यांसाठी “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगभरातील मराठी कलावंतांनी तयार केलेल्या लघुपटांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर याच पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरला वेंगुर्ले येथील बँ. खर्डेकर काँलेजमध्ये सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेत व कार्यशाळेत जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रबोधन गोरेगांव, मुंबई या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असून संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. संस्था आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात भरीव काम करत आली आहे. आणि पुढेही जोमाने करणार आहे. संस्थेच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्थेने `प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ अंतर्गत जगभरातील मराठी कलावंतानी तयार केलेल्या लघुपटाची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील प्रथम ५ विजेत्यांना प्रबोधन संस्थेतर्फे जगातल्या ३ `जागतिक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांत स्पर्धेत मराठी तरुणांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची मोठी संधी प्राप्त करून देणार आहे. यासाठी शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन/ फेस्टिव्हल प्रमोशन/मार्केटिंग’ या विषयावर विशेष कार्यशाळा विविध ठिकाणी आयोजित केल्या आहेत. त्यात जाणकारांचं सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे.
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लघूपट- प्रथम क्रमांक पुरस्कार रू. ७५ हजार, सर्वोत्कृष्ट लघूपट-द्वितीय क्रमांक पुरस्कार रू. ५० हजार, सर्वोत्कृष्ट लघूपट तृतीय क्रमांक पुरस्कार रू. २५ हजार, तसेच विशेष पुरस्कार- सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्तम लघुपट- रु. २५ हजार, मराठी नाटय़कृतीवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपट- रु. २५ हजार, मराठी साहित्यकृतीवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपट- रु. २५ हजार, फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिटय़ुटसमध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट- रु. २५ हजार, तसेच वैयक्तिक पुरस्कार- सर्वोत्कृष्ट पटकथाकार/छायाचित्रकार/ संकलक/ अभिनेता/अभिनेत्री यांना प्रत्येकी रु. १० हजार, रोख रकमेशिवाय पदक आणि प्रमाणपत्र, ५ सर्वोत्कृष्ट लघूपटांना जगातल्या ३ आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रवेश करण्याची संधी, `शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन/फेस्टिव्हल प्रमोशन/मार्केटिंग’ या विषयावर विशेष कार्यशाळा. त्यात जाणकारांचं सखोल मार्गदर्शन करण्यांत येणार आहे. यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेंगुर्लेतील बॅ. खर्डेकर काँलेजमध्ये होणार आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना देण्यात येणारे पुरस्कार आणि महोत्सवात/कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीची माहिती ई-मेल hello@prabodhanisff.in किंवा https://www.prabodhanisff.in यावर उपलब्ध आहे.
या महोत्सवात आणि कार्यशाळेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी कलावंतांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. असे आवाहन ख्यातनाम चित्रपट अभ्यासक, आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे जाणकार, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक व दिग्दर्शक आणि फेस्टिव्हल डायरेक्टर अशोक राणे यांनी प्रबोधन गोरेगांव या संस्थेतर्फे केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!