26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदा आळवाडी येथे उभारलेल्या सुसज्ज मच्छी मार्केट इमारतीचा लोकार्पण सोहळा ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब

सकारात्मक विचारांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. बांद्यातील नागरिकांनी नेहमीच भाजपच्या विचारला साथ दिली आहे. आदर्श ग्रामपंचायत ही बांद्याची ओळख आहे. गावात टेलिमेडिसीन सुरु असल्याने इथल्या रुग्णांना मुंबई सारख्या नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. शहरासाठी अग्निशमन बंब लवकरच दिला जाईल. मच्छीमार्केटमध्ये स्वच्छता ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. बांदा शहरासाठी जे जे मागाल ते सर्व दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.   

नागरी सुविधा योजने अंतर्गत बांदा आळवाडी येथे उभारलेल्या सुसज्ज मच्छी मार्केट इमारतीचा लोकार्पण सोहळा ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती प्रमोद कामत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी पं. स. सभापती शितल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतिब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये आदी उपस्थित होते.    

   ना. दीपक केसरकर म्हणाले,बांदा ही सावंतवाडी तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. पालकमंत्री ना. चव्हाण यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी भरीव निधी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. महायुतीसाठी जिल्ह्यात सध्या चांगले वातावरण आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब

सकारात्मक विचारांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. बांद्यातील नागरिकांनी नेहमीच भाजपच्या विचारला साथ दिली आहे. आदर्श ग्रामपंचायत ही बांद्याची ओळख आहे. गावात टेलिमेडिसीन सुरु असल्याने इथल्या रुग्णांना मुंबई सारख्या नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. शहरासाठी अग्निशमन बंब लवकरच दिला जाईल. मच्छीमार्केटमध्ये स्वच्छता ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. बांदा शहरासाठी जे जे मागाल ते सर्व दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.   

नागरी सुविधा योजने अंतर्गत बांदा आळवाडी येथे उभारलेल्या सुसज्ज मच्छी मार्केट इमारतीचा लोकार्पण सोहळा ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती प्रमोद कामत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी पं. स. सभापती शितल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतिब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये आदी उपस्थित होते.    

   ना. दीपक केसरकर म्हणाले,बांदा ही सावंतवाडी तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. पालकमंत्री ना. चव्हाण यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी भरीव निधी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. महायुतीसाठी जिल्ह्यात सध्या चांगले वातावरण आहे.

error: Content is protected !!