New National Cricket Academy: बीसीसीआयनं भारताच्या खेळाडूंसाठी नव्या नॅशनल क्रिकेट अकादमीची उभारणी केली आहे. यामध्ये जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. नव्या नॅशनल अकादमीचे फोटो शेअर करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.टीम इंडियाचे खेळाडू नॅशनल क्रिकेट अकादमी असले तर बाहेर पाऊस सुरु असला तरी सराव करु शकतात. कारण तिथं इनडोअर पिच तयार करण्यात आलं आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये फोटो शेअर केले आहेत. ते म्हणाले की बीसीसीआयनं नव्या नॅशनल क्रिकेट अकादमीची उभारणी केलेली आहे.
बंगळुरुत लवकरच याचं उद्घाटन केल जाईल. यामध्ये जागतिक दर्जाची तीन मैदानं, 45 खेळपट्टी, इनडोअर क्रिकेट पिच, ऑलिम्पिकच्या निकषानुसार स्वीमिंग पूल, रिकवरी आणि स्पोर्टस सायन्स फॅसिलिटी उपलब्ध असतील.
बीसीसीआयची जुनी क्रिकेट अकादमी बंगळुरुत आहे, नवी नॅशनल क्रिकेट अकादमी देखील बंगळुरुत उभारण्यात आली आहे. स्टेट ऑफ दर आर्ट ट्रेनिंग साठी एका विशेष सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. भारताचा एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या उपचारासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
बीसीसीआयनं टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसाठी चांगली पावलं उचलली आहेत. नव्या नॅशनल क्रिकेट अकादमीची उभारणी त्याचाच एक भाग आहे. इनडोअर पिच तयार करण्यात आल्यानं बाहेर पाऊस सुरु असला तरी खेळाडू इनडोअर पिचवर सराव करु शकतात.
फोटो सौजन्य:- BBCI / Jay Shah