रघुनाथ कदम दिग्दर्शित व स्वाती राजेंद्र कदम यांची निर्मिती..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित कलावंतांना जम बसवण्यासाठी उचलले पाऊल…!
कणकवली | उमेश परब : पु.ल.देशपांडे लिखित आणि श्री. रघुनाथ कदम दिग्दर्शित व स्वाती राजेंद्र कदम निर्मित ‘तुका म्हणे आता’ ही नाट्य कृती लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे.
गेली अनेक वर्षे नाट्य क्षेत्रात अनेक नावीन्य पूर्ण कलाकृती सादर करणाऱ्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी तुका म्हणे आता या नाटकाचा शुभारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी दिली आहे. वसंतराव आचरेकर कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष एन आर देसाई, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह राजेश राजाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य प्रसन्न देसाई, अभिनेते राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीत पाय रोवता यावा म्हणून हे नाटक व्यावसायिक स्वरूपात असणार आहे. १३ रोजी कणकवली येथे तर १४ तारीखला मालवण येथे प्रयोग होणार आहेत. नेहमीच यशस्वी प्रायोगिक नाटक सादर करणाऱ्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे व्यवसायिक नाटकात पहिलेच पाउल आहे. तब्बल दोन वर्षांनंतर रंगभूमीवरचा पडदा उघडणार असून याचे सर्व श्रेय हे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानला जातेय.
‘तुका म्हणे आता’ संगीत नाटकाची निर्मिती स्वाती राजेंद्र कदम यांनी केली असून दिग्दर्शन रघुनाथ कदम, नेपथ्य अंकुश कांबळी, प्रकाशयोजना संजय तोडणकर, संगीत- मंगेश कदम, मृदुंग, तबला- वैभव मांजरेकर, रंगभूषा, वेशभूषा- तारक कांबळी, नेपथ्यनिर्माण अजय पुजारे, रमेश सुतार, रंगमंच व्यवस्था- रवी सावंत, सूत्रधार एडव्होकेट एन. आर. देसाई असून यामध्ये कलाकार- श्याम नाडकर्णी, शरद सावंत, राजेंद्र कदम, सुदिन तांबे, विकास कदम, कुणाल आंगणे, पंकज कदम, सुविधा कदम, प्रियांका मुसळे यांनी भूमिका बजावल्या आहेत.
शुभेच्छा.