26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वारी मधील ‘त्याची’ कथा…!

- Advertisement -
- Advertisement -

लेखन : सायली राजन सामंत.
कुडाळ, सिंधुदुर्ग

टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा ||
माऊली निघाले पंढरपूरी, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला||
जय जय पांडुरंग हरी….!’

पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक अविस्मरणीय भक्तीमय सोहळा…! वारी म्हटली की आपल्या लाडक्या विठुरायास भेटण्यास उत्सुक असलेली, भक्ती रसात बुडालेली टाळ मृदुंगाच्या तालावर सकल संतांची भक्ती प्रदान परंपरा जपत देहभान विसरून, ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे आणि शिस्तबद्ध चालणारी अलोट जनसागराची साखळी! आपल्या लाडक्या विठुरायाच्या वारीत एक खास गंमत दडलेली आहे. ती गंमत म्हणजे या वारीत कुठल्याही वयाचे बंधन नसते. अगदी लहानपासून तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अगदी सगळे जण अगदी विठ्ठला प्रती श्रद्धाभाव ठेवत हरीनाम गजरात आकंठ बुडालेले असतात. ‘जय जय पांडुरंग हरी’ हा जयघोष त्या असंख्य वारकऱ्यांना थेट पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस जागवून देण्याच्या ऊर्जेच काम करतो.

प्रत्येकाला पंढरीच्या विठुरायाच दर्शन मनुष्य रूपात घडत असेल का? पंढरीचा पांडुरंग प्रत्येकाला मनुष्य रूपात दिसतोच असे नाही. पण वारीतल्या प्रत्येकाला असा आत्मविश्वास असतो की माझा सखा पांडुरंग आपल्या वारीतच सामील झालेला आहे. आपल्या बरोबरीने फेर धरून टाळ मृदग मृदुंगाच्या गजरात ठेका धरत आम्हा वारकऱ्यांपैकीच एक होऊन गेला आहे.

अशीही एक वारी..!

महाराष्ट्रातील आळंदी येथून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन त्या वारीतले पालखीचे भोई अंखंड हरिनाम घेत टाळ मृदुंगाचा जयघोष करत ती पालखी चंद्रभागेच्या तिरावर वसलेल्या पंढरपूरकडे आषाढी एकादशीचे औचित्य साधत मार्गस्थ होत होती. गर्दीमधून एकच आवाज दुमदुमत होता तो म्हणजे ‘पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय… पंढरीनाथ महाराज की जय.!’

वारीतील वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घडू नये म्हणूनच तर महाराष्ट्र पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. अशा वारीत पावसाची जोरदार सर टाळ मृदूंगाचा ठेका धरत एकरूप झालेली त्यात एक ८५ वर्षांचे ज्येष्ठ वारकरी विठ्ठलाच्या भेटीकडे आस लावून, पावसाची तमा न बाळगता देहभान विसरून विठ्ठल नामात तल्लीन होऊन नाचत नाचत गात होते. तो अविस्मरणीय साक्षात्कार एक पोलीस अधिकारी दलातील एक अधिकारी त्यांचाशी संवाद साधायला आले व म्हणाले,”माऊली कशी काय जमतेय हो तुम्हाला वारी. ? काय त्रास वगैरे नाही होत ना तुम्हाला?”
त्यावर ते माऊली म्हणाले,” नाय ओ त्रास कसला..! विठुरायाच्या संगतीन टाळ कुटाया मिळतायत तेच आमचं परम भाग्य आहे…!”
हे ऐकून पोलिस अधिकारी साहेबांना आश्यर्य वाटलं आणि साहेबांना रहावे ना म्हणून त्यांनी विचारले,” विठुरायाच्या संगतीने म्हणजे ओ?”
त्यावर स्मित हास्य करत ज्येष्ठ वारकरी म्हणाले,” साहेब, इथल्या प्रत्येक माणसाच्या तना मनात हृदयात टाळा मृदुंगात आणि अणू रेणूत विठ्ठल वसलाय…! तो आमच्याकडं बघून आणि आम्ही त्याच्याकडं बघून ह्या निःस्वार्थ वारीत आम्ही पार बुडालोया बघा. विठ्ठल तर आमच्या हृदयाच्या गाभारी विराजमान झालाय. तो हृदयातनं आम्हास्नी ऊर्जा देतोय साहेब…! त्या ऊर्जेमुळं आमची पावलं टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर थिरकतायत बघा. साहेब, तोच हाय कर्ता आनी करवीता. त्याच्या आदेशा शिवाय इथल्या झाडाचं एक पान बी हालत नाय..! पांडुरंगाचं नांव की नाय साहेब आमच्यासाठी टॉनिक हाय टॉनिक. बोला बोला साहेब आमच्या संगतीनं तुम्ही बी बोला पांडुरंग हरी…. त्या पांडुरंगाच्या नावानं तुमच बी जीवन सुखकर होऊन जाणार हाय बघा..!”

हे सगळं ऐकून घेऊन त्या साहेबांनी त्या माउलींना विचारलं की,” एक विचारू का तुम्हाला माऊली? विठ्ठलाने तुमच्याशी कधी संवाद साधलाय काय हो ?”
त्यावर ते ज्येष्ठ वारकरी म्हणाले, “ओ साहेब..! येवढं घर दार सोडून आम्ही येवढ्या लांब वारीत सहभागी झालो. आमच्या घरा दाराची चिंता आमच्या बायका पोरांवर टाकून आम्ही वारीत सहभागी व्हायचं ठरवतो ना, तवां वारीला निघायच्या आधी माझा ईठुराया साक्षात माझ्या सपनांत येऊन मला सांगतोय की लेकरा निश्चिंत बाहेर पड. तुझ्या घरा दाराची काळजी घ्यायला आहे ना हा तुझा विठू…! हा माझ्या देवानं माझ्याशी साधलेला संवाद. साहेब काय तुम्हास्नी सांगू. या अपार संवादाची गोडी आहे अमृता परी, चव हाय बगा त्याची लय न्यारी…! म्हणून सांगतोय तुम्हास्नी साहेब आइका माझं माझ्या संगतीन तुम्ही बी बोला, हरी बोला हरी पांडुरंग हरी..!”
या संवादाने त्या पोलीस अधिकाऱ्याला भक्ती महात्म्याच्या थोरवीच गमक समजलं. भक्ती महात्म्यातील अथांगता उतुंगता पाहून त्या पोलीस अधिकाऱ्याचं मन गहिवरून आलं. तो स्तब्ध झाला. त्याचे डोळे क्षणार्धात पाणावले आणि नकळत त्याच्या मुखातून,”हरी बोला हरी पांडुरंग हरी” असे शब्द बाहेर पडले. त्या नंतर तो भानावर आला. डोळे उघडून पहातो तर काय त्याच्याशी संवाद साधणारी ती बुजुर्ग वारकरी रूपातील अलौकीक व्यक्ती त्या लाखो भाविकांच्या जनसागरात अदृश्य झाली होती. त्या पोलीस अधिकाऱ्यानं आजूबाजूला पहात त्या बुजुर्ग वारकरी रूपातील व्यक्तीला शोधण्याचा फार प्रयत्न केला. त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून आवाज आला,’अरे पोलीस वारकऱ्या मला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या वारकऱ्यांची तू काळजी घेतो आहेस. तुझी काळजी घेण्यासाठी मी विटेवर युगे अठ्ठावीस उभा आहे. भविष्यात तुला कशाचीही कमी मी भासू देणार नाही. कारण तू निभावलेल्या जबाबदारीची तुळशीची माळ माझ्या गळ्यात अगोदरच पडलेली आहे…!’

हा साक्षात विठुरायाने त्याच्या हृदयातून त्याच्याशी साधलेला संवाद ऐकून त्या पोलीस अधिकाऱ्याला आपला मानवरुपी जन्म सार्थकी लागल्याचा प्रत्यय आला. त्याची पावलं पुन्हा कर्तव्यतत्पर जाली. पण ती जबाबदारी निभावत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्याची कार्यतत्परता क्षणा क्षणाला गाऊ लागली ‘ विठू माझा, विठू माझा, हृदयाच्या गाभारी, त्याची करितो पूजा मी जबाबदारीची तुळशी माळ विठ्ठलास अर्पूनी…!’

जय हरी विठ्ठल….जय जय विठ्ठल..!

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

लेखन : सायली राजन सामंत.
कुडाळ, सिंधुदुर्ग

'टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा ||
माऊली निघाले पंढरपूरी, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला||
जय जय पांडुरंग हरी....!'

पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक अविस्मरणीय भक्तीमय सोहळा…! वारी म्हटली की आपल्या लाडक्या विठुरायास भेटण्यास उत्सुक असलेली, भक्ती रसात बुडालेली टाळ मृदुंगाच्या तालावर सकल संतांची भक्ती प्रदान परंपरा जपत देहभान विसरून, ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे आणि शिस्तबद्ध चालणारी अलोट जनसागराची साखळी! आपल्या लाडक्या विठुरायाच्या वारीत एक खास गंमत दडलेली आहे. ती गंमत म्हणजे या वारीत कुठल्याही वयाचे बंधन नसते. अगदी लहानपासून तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अगदी सगळे जण अगदी विठ्ठला प्रती श्रद्धाभाव ठेवत हरीनाम गजरात आकंठ बुडालेले असतात. 'जय जय पांडुरंग हरी' हा जयघोष त्या असंख्य वारकऱ्यांना थेट पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस जागवून देण्याच्या ऊर्जेच काम करतो.

प्रत्येकाला पंढरीच्या विठुरायाच दर्शन मनुष्य रूपात घडत असेल का? पंढरीचा पांडुरंग प्रत्येकाला मनुष्य रूपात दिसतोच असे नाही. पण वारीतल्या प्रत्येकाला असा आत्मविश्वास असतो की माझा सखा पांडुरंग आपल्या वारीतच सामील झालेला आहे. आपल्या बरोबरीने फेर धरून टाळ मृदग मृदुंगाच्या गजरात ठेका धरत आम्हा वारकऱ्यांपैकीच एक होऊन गेला आहे.

अशीही एक वारी..!

महाराष्ट्रातील आळंदी येथून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन त्या वारीतले पालखीचे भोई अंखंड हरिनाम घेत टाळ मृदुंगाचा जयघोष करत ती पालखी चंद्रभागेच्या तिरावर वसलेल्या पंढरपूरकडे आषाढी एकादशीचे औचित्य साधत मार्गस्थ होत होती. गर्दीमधून एकच आवाज दुमदुमत होता तो म्हणजे 'पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय… पंढरीनाथ महाराज की जय.!'

वारीतील वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घडू नये म्हणूनच तर महाराष्ट्र पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. अशा वारीत पावसाची जोरदार सर टाळ मृदूंगाचा ठेका धरत एकरूप झालेली त्यात एक ८५ वर्षांचे ज्येष्ठ वारकरी विठ्ठलाच्या भेटीकडे आस लावून, पावसाची तमा न बाळगता देहभान विसरून विठ्ठल नामात तल्लीन होऊन नाचत नाचत गात होते. तो अविस्मरणीय साक्षात्कार एक पोलीस अधिकारी दलातील एक अधिकारी त्यांचाशी संवाद साधायला आले व म्हणाले,"माऊली कशी काय जमतेय हो तुम्हाला वारी. ? काय त्रास वगैरे नाही होत ना तुम्हाला?"
त्यावर ते माऊली म्हणाले," नाय ओ त्रास कसला..! विठुरायाच्या संगतीन टाळ कुटाया मिळतायत तेच आमचं परम भाग्य आहे…!"
हे ऐकून पोलिस अधिकारी साहेबांना आश्यर्य वाटलं आणि साहेबांना रहावे ना म्हणून त्यांनी विचारले," विठुरायाच्या संगतीने म्हणजे ओ?"
त्यावर स्मित हास्य करत ज्येष्ठ वारकरी म्हणाले," साहेब, इथल्या प्रत्येक माणसाच्या तना मनात हृदयात टाळा मृदुंगात आणि अणू रेणूत विठ्ठल वसलाय…! तो आमच्याकडं बघून आणि आम्ही त्याच्याकडं बघून ह्या निःस्वार्थ वारीत आम्ही पार बुडालोया बघा. विठ्ठल तर आमच्या हृदयाच्या गाभारी विराजमान झालाय. तो हृदयातनं आम्हास्नी ऊर्जा देतोय साहेब…! त्या ऊर्जेमुळं आमची पावलं टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर थिरकतायत बघा. साहेब, तोच हाय कर्ता आनी करवीता. त्याच्या आदेशा शिवाय इथल्या झाडाचं एक पान बी हालत नाय..! पांडुरंगाचं नांव की नाय साहेब आमच्यासाठी टॉनिक हाय टॉनिक. बोला बोला साहेब आमच्या संगतीनं तुम्ही बी बोला पांडुरंग हरी…. त्या पांडुरंगाच्या नावानं तुमच बी जीवन सुखकर होऊन जाणार हाय बघा..!"

हे सगळं ऐकून घेऊन त्या साहेबांनी त्या माउलींना विचारलं की," एक विचारू का तुम्हाला माऊली? विठ्ठलाने तुमच्याशी कधी संवाद साधलाय काय हो ?"
त्यावर ते ज्येष्ठ वारकरी म्हणाले, "ओ साहेब..! येवढं घर दार सोडून आम्ही येवढ्या लांब वारीत सहभागी झालो. आमच्या घरा दाराची चिंता आमच्या बायका पोरांवर टाकून आम्ही वारीत सहभागी व्हायचं ठरवतो ना, तवां वारीला निघायच्या आधी माझा ईठुराया साक्षात माझ्या सपनांत येऊन मला सांगतोय की लेकरा निश्चिंत बाहेर पड. तुझ्या घरा दाराची काळजी घ्यायला आहे ना हा तुझा विठू…! हा माझ्या देवानं माझ्याशी साधलेला संवाद. साहेब काय तुम्हास्नी सांगू. या अपार संवादाची गोडी आहे अमृता परी, चव हाय बगा त्याची लय न्यारी…! म्हणून सांगतोय तुम्हास्नी साहेब आइका माझं माझ्या संगतीन तुम्ही बी बोला, हरी बोला हरी पांडुरंग हरी..!"
या संवादाने त्या पोलीस अधिकाऱ्याला भक्ती महात्म्याच्या थोरवीच गमक समजलं. भक्ती महात्म्यातील अथांगता उतुंगता पाहून त्या पोलीस अधिकाऱ्याचं मन गहिवरून आलं. तो स्तब्ध झाला. त्याचे डोळे क्षणार्धात पाणावले आणि नकळत त्याच्या मुखातून,"हरी बोला हरी पांडुरंग हरी" असे शब्द बाहेर पडले. त्या नंतर तो भानावर आला. डोळे उघडून पहातो तर काय त्याच्याशी संवाद साधणारी ती बुजुर्ग वारकरी रूपातील अलौकीक व्यक्ती त्या लाखो भाविकांच्या जनसागरात अदृश्य झाली होती. त्या पोलीस अधिकाऱ्यानं आजूबाजूला पहात त्या बुजुर्ग वारकरी रूपातील व्यक्तीला शोधण्याचा फार प्रयत्न केला. त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून आवाज आला,'अरे पोलीस वारकऱ्या मला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या वारकऱ्यांची तू काळजी घेतो आहेस. तुझी काळजी घेण्यासाठी मी विटेवर युगे अठ्ठावीस उभा आहे. भविष्यात तुला कशाचीही कमी मी भासू देणार नाही. कारण तू निभावलेल्या जबाबदारीची तुळशीची माळ माझ्या गळ्यात अगोदरच पडलेली आहे…!'

हा साक्षात विठुरायाने त्याच्या हृदयातून त्याच्याशी साधलेला संवाद ऐकून त्या पोलीस अधिकाऱ्याला आपला मानवरुपी जन्म सार्थकी लागल्याचा प्रत्यय आला. त्याची पावलं पुन्हा कर्तव्यतत्पर जाली. पण ती जबाबदारी निभावत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्याची कार्यतत्परता क्षणा क्षणाला गाऊ लागली ' विठू माझा, विठू माझा, हृदयाच्या गाभारी, त्याची करितो पूजा मी जबाबदारीची तुळशी माळ विठ्ठलास अर्पूनी…!'

जय हरी विठ्ठल....जय जय विठ्ठल..!

error: Content is protected !!