ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी कला अंगणचे संस्थापक व कोकणातील कळसुत्री बाहुल्यांच्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलावंत श्री परशुराम गंगावणे यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळ पिंगुळी गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकाहून अधीक काळ आदिवासी लोककलांचे जतन व संवर्धन केले.
आज माजी केंद्रीय मंत्री श्री.सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला गेला. त्यावेळी केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित होते.
सुरेश प्रभू यांच्याहस्ते झालेला हा सत्कार एका कोकणवासियाची दुसर्या कोकणवासियासाठीची मायेची व अभिमानाची मोहोर असल्याचे पद्मश्री गंगावणेंचे सुपुत्र व ठाकर आदिवासी कला आंगणचे कार्यरत पदाधिकारी व प्रकल्प तंत्रज्ञ श्री चेतन गंगावणे यांनी सांगितले आहे.