आ. वैभव नाईक यांच्यावतीने राबिवल्या जाणार्या उपक्रमात शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर व पदाधिकारी उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील जि. प. शाळा देऊळवाडा, मालवण येथे वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात राबवल्या जाणार्या या उपक्रम कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, देऊळवाडा शाखा प्रमुख गणेश चव्हाण, मोहन मराळ, शिवसेना महिला आघाडी उप शहरप्रमुख नीना मुंबरकर, युवासेना उप शहरप्रमुख उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ कवटकर, सुहास वालावलकर, दत्तगुरु पोईपकर तसेच देऊळवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव, सहकारी सौ. प्रांजली चव्हाण, राखी मालवणकर, भूमिका यादव व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव यांनी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर व सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या म्हणाल्या की, शिवसेना ( उ. बा. ठा.) यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखत मदत करणे हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरु असलेला उपक्रम स्तुत्य असून, शिवसेना मालवणचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर, देऊळवाडा शाखाप्रमुख गणेश चव्हाण, उमेश चव्हाण व शिवसैनिक यांचे शाळेला नेहमीच सहकार्य लाभले आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सांगितले की शिक्षण हे परिस्थितीवर मात करायचे महत्वाचे साधन आहे. मोबाईलचा उपयोग आपल्याला शाळेत जे शिकवले जाते त्या संदर्भातील गोष्टींसाठी करावा. लोकमान्य टिळक ज्या शाळेत शिकले त्याच देऊळवाडा शाळेत तुम्ही शिकत असल्याचेही तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. या वह्या वाटपाच्या माध्यमातून, आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत व मालवण शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हे शाळेच्या गरजांचा आढावा घेत आहेत.
यावेळी शिवसेना देऊळवाडा शाखा प्रमुख गणेश चव्हाण, शिवसेना महिला उप शहरप्रमुख नीना मुंबरकर, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ कवटकर, सुहास वालावलकर यांनी त्यांचे मनीगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव यांनी सर्वांचे आभार मानले.