मसुरे | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालक्यातल्या परांजपे मोतीवाले विद्यालयाच्या कु. स्वराली सतिश मुणगेकर या विद्यार्थिनीने इयत्ता ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून चिपळूण तालुका गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक व रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत ४९ वा क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल तिचे वडील सतिश मुणगेकर व आई संस्कृती मुणगेकर, मामा, मामी, काका, काकी, आजी ,आजोबा सर्व मुणगेकर आणि कांबळे परिवार व मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.
५ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही स्वरालीने तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत उज्वल यश संपादन केले होते. तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक व आई वडाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे कु. स्वराली हिने सांगितले .