28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

नेरूर शिरसोस शाळेचा कु. पियुष लाड भारत टॅलेंट सर्च (B. T. S.) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात सहावा..!

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ । देवेंद्र गावडे : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोस शाळेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. पियुष विजय लाड याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उज्वल यश संपादन करत महाराष्ट्र राज्यात सहावा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. कु. पियुष याने सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च(S. T. S. )परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक तसेच डॉट कॉम असोसिएशन ( D. C. A. )या परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी त्याला वर्गशिक्षिका श्रीम. अरुणा घाटकर व त्याचे वडील श्री विजय लाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल वालावल प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मान.श्री.नदाफ सर केंद्रप्रमुख मान.श्री गोविंद चव्हाण मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण ठाकूर पदवीधर शिक्षिका श्रीम. प्रीती कुबल उपशिक्षिका श्रीम.पूजा कोठावळे, शाळा व्यवस्थापन समिती नेरूर शिरसोस ,पालक शिक्षक संघ या सर्वांनी पियुष चे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडीगांवकर तसेच तंटामुक्ती अध्यक्षा लक्ष्मी सडवेलकर यांनीही पियुषचे विशेष अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ । देवेंद्र गावडे : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोस शाळेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. पियुष विजय लाड याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उज्वल यश संपादन करत महाराष्ट्र राज्यात सहावा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. कु. पियुष याने सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च(S. T. S. )परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक तसेच डॉट कॉम असोसिएशन ( D. C. A. )या परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी त्याला वर्गशिक्षिका श्रीम. अरुणा घाटकर व त्याचे वडील श्री विजय लाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल वालावल प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मान.श्री.नदाफ सर केंद्रप्रमुख मान.श्री गोविंद चव्हाण मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण ठाकूर पदवीधर शिक्षिका श्रीम. प्रीती कुबल उपशिक्षिका श्रीम.पूजा कोठावळे, शाळा व्यवस्थापन समिती नेरूर शिरसोस ,पालक शिक्षक संघ या सर्वांनी पियुष चे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडीगांवकर तसेच तंटामुक्ती अध्यक्षा लक्ष्मी सडवेलकर यांनीही पियुषचे विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!