30 C
Mālvan
Friday, April 4, 2025
IMG-20240531-WA0007

कुडाळ येथे जिल्हास्तरीय ‘उमंग करीअर मार्गदर्शन मेळावा २०२४’ चे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ । देवेंद्र गावडे : कुडाळ शहरात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग’ करीअर मार्गदर्शन मेळावा २०२४’ संपन्न होत आहे. २९ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी हे करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला आहे. सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन जवळ कुडाळ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे उपस्थित असणार आहेत. रोटरी चे गव्हर्नर रो. नसीर बोरसादवाला, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुंबई येथील नामवंत डॉक्टर अमेय देसाई या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत. याप्रसंगी सारथीच्या सहसंचालिका तथा अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी ,निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे, कुडाळ प्रांताधिकारी श्रीम. ऐश्वर्या काळुसे आणि तसेच एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉ.अमेय देसाई, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS ऑफिसर श्री कृषिकेश रावले, एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे, तहसीलदार वीरसिंह वसावे, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, डॉक्टर संजय केसरे, डॉक्टर संजय सावंत, डॉ. विद्याधर तायशेटे , उद्योजक नितीन वाळके, वेंगुर्ले नगरपलीचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, शिवानंद भिडे, पत्रकार राजेश मोंडकर, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते श्री. केदार देसाई, प्रणाली मयेकर विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवा येथील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सुभाष साजणे यांचे विशेष मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

याप्रसंगी एमकेसीएलच्या करिअर ॲपचे अनावरण होणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना एमकेसीएल करिअर ॲप मोफत दिले जाणार आहे. यावेळी एमकेसीएल ओलंपियाड मूव्हमेन्ट या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांना कृतज्ञतापर भेटवस्तू दिलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक या प्रसंगी होईल. तसेच उदयोन्मुख करिअर घडविणाऱ्या काही व्यक्तींचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी विद्यार्थिनी कु. सिद्धी शिवानंद भिडे या विद्यार्थिनीचा देखील सत्कार केला जाणार आहे. तिचे विशेष मनोगत देखील यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जाणून घेता येईल.

या शिबिरामध्ये यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा, मेडिकल मधील करिअर, माहिती तंत्रज्ञानातील करिअर, करिअर करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय, गणित आणि विज्ञानातील करिअर, अभिनय क्षेत्रातील करिअर्स, पॅरामेडिकल क्षेत्रातील करिअर अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे हे शिबिर पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांची सकाळी नाष्ट्याची दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच यावेळी, MKCL करिअर मंत्राचे प्रकाशन केले जाणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या संदर्भातील पत्रकार परीषद प्रसंगी याप्रसंगी MKCLचे जिल्हा समन्वयक श्री. प्रणय तेली, रोटरी क्लब, कुडाळचे अध्यक्ष श्री. दिनेश आजगांवकर, असि. गव्हर्नर श्री. बोभाटे, गव्हर्नर एरिया एड श्री. गजानन कांदळगावकर, सिंधुसंकल्प अकादमी, कुडाळचे श्री. केदार देसाई, भूषण तेजम, MKCLचे प्रतिनिधी श्री. देवेंद्र गावडे व श्री. राकेश तिरोडकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ । देवेंद्र गावडे : कुडाळ शहरात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 'उमंग' करीअर मार्गदर्शन मेळावा २०२४' संपन्न होत आहे. २९ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी हे करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला आहे. सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन जवळ कुडाळ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे उपस्थित असणार आहेत. रोटरी चे गव्हर्नर रो. नसीर बोरसादवाला, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुंबई येथील नामवंत डॉक्टर अमेय देसाई या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत. याप्रसंगी सारथीच्या सहसंचालिका तथा अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी ,निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे, कुडाळ प्रांताधिकारी श्रीम. ऐश्वर्या काळुसे आणि तसेच एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉ.अमेय देसाई, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS ऑफिसर श्री कृषिकेश रावले, एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे, तहसीलदार वीरसिंह वसावे, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, डॉक्टर संजय केसरे, डॉक्टर संजय सावंत, डॉ. विद्याधर तायशेटे , उद्योजक नितीन वाळके, वेंगुर्ले नगरपलीचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, शिवानंद भिडे, पत्रकार राजेश मोंडकर, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते श्री. केदार देसाई, प्रणाली मयेकर विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवा येथील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सुभाष साजणे यांचे विशेष मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

याप्रसंगी एमकेसीएलच्या करिअर ॲपचे अनावरण होणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना एमकेसीएल करिअर ॲप मोफत दिले जाणार आहे. यावेळी एमकेसीएल ओलंपियाड मूव्हमेन्ट या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांना कृतज्ञतापर भेटवस्तू दिलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक या प्रसंगी होईल. तसेच उदयोन्मुख करिअर घडविणाऱ्या काही व्यक्तींचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी विद्यार्थिनी कु. सिद्धी शिवानंद भिडे या विद्यार्थिनीचा देखील सत्कार केला जाणार आहे. तिचे विशेष मनोगत देखील यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जाणून घेता येईल.

या शिबिरामध्ये यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा, मेडिकल मधील करिअर, माहिती तंत्रज्ञानातील करिअर, करिअर करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय, गणित आणि विज्ञानातील करिअर, अभिनय क्षेत्रातील करिअर्स, पॅरामेडिकल क्षेत्रातील करिअर अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे हे शिबिर पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांची सकाळी नाष्ट्याची दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच यावेळी, MKCL करिअर मंत्राचे प्रकाशन केले जाणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या संदर्भातील पत्रकार परीषद प्रसंगी याप्रसंगी MKCLचे जिल्हा समन्वयक श्री. प्रणय तेली, रोटरी क्लब, कुडाळचे अध्यक्ष श्री. दिनेश आजगांवकर, असि. गव्हर्नर श्री. बोभाटे, गव्हर्नर एरिया एड श्री. गजानन कांदळगावकर, सिंधुसंकल्प अकादमी, कुडाळचे श्री. केदार देसाई, भूषण तेजम, MKCLचे प्रतिनिधी श्री. देवेंद्र गावडे व श्री. राकेश तिरोडकर उपस्थित होते.

error: Content is protected !!