श्री राष्ट्रोळी सांस्कृतीक कलाक्रीडा मंडळाने केले होते आयोजन..
ब्युरो न्यूज | वेंगुर्ले : नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री देव राष्ट्रोळी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित खुल्या भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळ द्वितीय तर माटणेच्या श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री राष्ट्रोळी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने खुली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तुळस येथील स्वामी समर्थ मठाचे मिलिंद शेटकर महाराज, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विलास सावंत, अनिल सरमळकर, गणपत गवस, देवेंद्र गवस, दुलाजी गवस उपस्थित होते. स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धे दरम्यान एकापेक्षा एक सरस भजने सादर करण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी, द्वितीय श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, तृतीय श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ माटणे, उत्तेजनार्थ श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मेणकुरे डिचोली, शिस्तबद्घ संघ – श्री सातेरी पुरमार भजनी मंडळ धुमासे गोवा, उत्कृष्ट गायक – चैताली चंद्रकांत परब (साळ गोवा), उत्कृष्ट गौळण गायक – समीर शिरोडकर (माटणे), उत्कृष्ट हार्मोनियम वादक – समीर नाईक (मणेरी), तबलावादक – जानू शिरवलकर (माटणे), पखवाजवादक – भावेश राणे (सांगेली), झांजवादक – साहिल नाईक (मळेवाड), कोरस – कलासाधना संगीत संस्था हणखणे गोवा, उत्कृष्ट श्रोता – उल्हास गवस. सर्व विजेत्या स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत व उद्योजक आनंद गवस यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शामसुंदर गवस, रविंद्र गवस, उपसरपंच प्रशांत कामत, विलास गवस, दुलाजी गवस, पुंडलिक नाईक, दीपक नाईक, रामदास नाईक, निळकंठ गवस, सखाराम गवस, सत्यनारायण गवस, मुकुंद नाईक, सुनील गवस उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण निलेश मेस्त्री व रोहिदास परब यांनी केले.