26.9 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

आता तुमची जबाबदारी वाढली ; आमदार वैभव नाईक यांचे दहावी व बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

आपल्या मतदार संघातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यश मिळवल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना असीम आनंद होतो : शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर.

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेना आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण – विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक व मालवण युवासेना आयोजित, २०२४ सालच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. मालवण वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण सभागृह येथे, आज २२ जून रोजी दुपारी आयोजीत या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांच्यासह, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर व तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी नितीन वाळके, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उप शहरप्रमुख सन्मेष उर्फ राजू परब, उमेश मांजरेकर, यशवंत गांवकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, कै. विजयराव नाईक काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री मंदार सावंत, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सौ. सेजल परब, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मसुरे विभाग प्रमुख व मर्डे उपसरपंच राजेश गांवकर, अनंत पाटकर, नितीन राऊळ, युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, युवतीसेना तालुका अधिकारी सौ. निनाक्षी मेथर, युवतीसेना देवबाग विभाग प्रमुख मानसी डिचवलकर , दत्ता पोईपकर व शिवसेना, युवा सेना व युवतीसेना तसेच महिला आघाडी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मालवण शहर व तालुक्यातील जवळपास दिडशे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी गोरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. अनंत पाटकर यांनी प्रथम, आमदार वैभव नाईक तसेच मंचावरील मान्यवरांचे, पदाधिकार्यांचे आणि गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. यानंतर आमदार वैभव नाईक व मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला व हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख कै. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी, कै. विजयराव नाईक काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. मंदार सावंत यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपले पुढील शिक्षण व कोर्सेस यांची जाणीवपूर्वक योग्य निवड करणे आवश्यक आहे. त्या कोर्सेसना ज्या शिष्यवृत्ती आहेत त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ही महत्वाची आहे. कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या डिग्री मधून चांगले करीअर घडेलच असे नाही, परंतु आपल्याला भरपूर ज्ञान मिळाले तर आपण निवडलेल्या संबंधित क्षेत्रात नक्कीच टाॅपवर जाऊ शकतो.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, दहावी बारावी पर्यंतच्या तुमच्या यशाच्या संघर्षाचे मनापासून कौतुक आहे. यानंतर यश मिळवतच रहाणे ही स्पर्धात्मक युगातील गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे यश हे अत्यंत उल्लेखनीय असल्याने त्यांच्या गुणगौरव सत्काराचा हा उपक्रम आम्ही गेली १० वर्षे हा उपक्रम आनंदाने राबवत आहोत. आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की आज वाहन चालक ते अगदी मैल मजूर अशा क्षेत्रात देखिल सर्व शाखांमधील पदवीधर आहेत त्यामुळे शैक्षणिक यश ही महत्वाची गरज आहेच. आता प्रशालेच्या बोर्डवर तुमचे नांव ‘गुणवंत’ म्हणून लागले आहे त्यामुळे तुमची यश प्राप्त करायची जबाबदारी वाढली आहे. यश मिळवण्याचे दडपण न घेता ते आपल्या चांगल्या भविष्यासाठी आहे त्यामुळे त्यासाठी आनंदाने परीश्रम करावेत असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. ए. आय. सारख्या क्षेत्रातील रोज आव्हानात्मक संधींचा देखिल विचार करणे व त्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आपल्याला जीवनात केवळ बघ्याची भूमिका घ्यायची नाही आहे तर विपरीत परिस्थितीमध्ये, सर्वांसाठी काहीतरी भरीव करायची वृत्ती आपल्यात सतत जागृत ठेवावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

यावेळी बोलताना शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर म्हणाले की तुम्हा गुणवंतांच्या यशाचा तुमच्या पालकांना जसा आनंद असतो तसा आमदार वैभव नाईक यांना आपल्या मतदार संघातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशाचा असीम आनंद होत असतो. ‘आमदार वैभव नाईक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा’, अशी त्यांची मुंबई व महाराष्ट्र राज्यात ओळख आहे कारण ते इथल्या सर्वांना आपलेसे वाटतात असे काम ते नेहमी करतात. भाई गोवेकर यांनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना सतत मेहनतीची तयारी ठेवण्याचे आवाहन केले व त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले की कोणतीही गोष्ट शिकणं हे फार महत्वाचं असतं. श्री देवी सरस्वती चरणी तुम्ही नतमस्तक झालात म्हणून हे यश मिळवले आहात. अगदी राजकारण क्षेत्रातही रोज काहीतरी शिकल्याशिवाय कोणीच टिकू शकत नाही. धाडसाने व प्रामाणिक चिकाटीने शिक्षण घेत रहायचा सल्लाही त्यांनी दिला. तुमचे हे उल्लेखनीय यश अत्यंत अभिनंदनीय आनंदाचे आहे असेही तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना नितीन वाळके म्हणाले की आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना सहजपणे द्यायची एक वृत्ती जी निर्माण झालेली आहे ती त्याच पाल्यांच्या पुढील वाटचालीसाठी घातक ठरत आहे. पालकांनी ह्या अशा गोष्टी करणे म्हणजे पाल्यांचे नुकसान आहे. या सत्काराच्या निमित्ताने हे आपण हे आज मुद्दाम सांगतोय कारण प्रत्येक पाल्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याला काय हवे आहे व त्याने निवडलेल्या मार्गावर त्याला मार्गदर्शन कसे उत्तम मिळेल हे पाहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की डाॅक्टर इंजिनिअर यांसोबतच आणखीन सर्व क्षेत्रातच तुम्ही सर्वोच्च क्रमांक मिळवू शकता. यासाठी आपल्याला माहीत नसलेल्या कोर्सेसची माहिती करुन घ्यावी व त्याची आपल्याला आवड लागू शकते की नाही यावर चर्चा मार्गदर्शन यांचा आधार घ्यावा. केवळ पालक सांगतात किंवा मित्र परीवार अमूक एक शैक्षणिक मार्ग निवडतात म्हणून तुम्ही सुद्धा तिच शैक्षणिक वाट निवडू नका. आपल्या शैक्षणिक आवडी विषयी पालकांशी नम्रपणे संवाद साधा आणि त्या आवडीच्या क्षेत्रात करीअरसाठी असे झोकून द्या की पालकांना त्याचे समाधान वाटेल. यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या सह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शिवसेना, युवासेना व युवतीसेनेचे पदाधिकारी नेहमी तुमच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील असा विश्वास मंदार ओरसकर यांनी उपस्थित गुणवंत व त्यांचे पालक यांना दिला

यावेळी बोलताना महिला तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांनी गुरुजनांचे जीवनातील स्थान महत्वाचे असल्याचे सांगितले. करीअर घडता घडता आपण माणुस म्हणून किती चांगले घडू शकतो हे ही शिकणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

यानंतर युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेक्षणिक जीवनात योग्यवेळी व निर्णय घेताना सारासार विचार करावा आणि त्याचसोबत आपण ज्या मातीत जन्मलो आहोत त्या मातीचे सर्वांगीण ॠण फेडणे हे सुद्धा महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते, नुकताच एका पर्यटकाचा जीव वाचवलेल्या मालवणातील कु. रुद्र गांवकर, कु. अंगद गांवकर, कु. वरद सापळे व कु. हर्ष कुबल या चार जलतरण पटूंचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे प्रशिक्षक श्री. प्रफुल्ल गवंडे उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक व युवासेना मालवण यांनी आयोजीत केलेल्या दहावी बारावीतील गुणवत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव या सत्कार कार्यक्रमाबद्दल उपस्थित गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी समाधान व्यक्त केले आणि आमदार वैभव नाईक व युवासेना मालवण, यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक यांची कन्या कु. नंदिनी वैभव नाईक विशेष उपस्थित होती.

सूत्रसंचालक अनंत पाटकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपल्या मतदार संघातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यश मिळवल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना असीम आनंद होतो : शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर.

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेना आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण - विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक व मालवण युवासेना आयोजित, २०२४ सालच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. मालवण वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण सभागृह येथे, आज २२ जून रोजी दुपारी आयोजीत या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांच्यासह, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर व तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी नितीन वाळके, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उप शहरप्रमुख सन्मेष उर्फ राजू परब, उमेश मांजरेकर, यशवंत गांवकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, कै. विजयराव नाईक काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री मंदार सावंत, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सौ. सेजल परब, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मसुरे विभाग प्रमुख व मर्डे उपसरपंच राजेश गांवकर, अनंत पाटकर, नितीन राऊळ, युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, युवतीसेना तालुका अधिकारी सौ. निनाक्षी मेथर, युवतीसेना देवबाग विभाग प्रमुख मानसी डिचवलकर , दत्ता पोईपकर व शिवसेना, युवा सेना व युवतीसेना तसेच महिला आघाडी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मालवण शहर व तालुक्यातील जवळपास दिडशे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी गोरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. अनंत पाटकर यांनी प्रथम, आमदार वैभव नाईक तसेच मंचावरील मान्यवरांचे, पदाधिकार्यांचे आणि गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. यानंतर आमदार वैभव नाईक व मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला व हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख कै. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी, कै. विजयराव नाईक काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. मंदार सावंत यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपले पुढील शिक्षण व कोर्सेस यांची जाणीवपूर्वक योग्य निवड करणे आवश्यक आहे. त्या कोर्सेसना ज्या शिष्यवृत्ती आहेत त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ही महत्वाची आहे. कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या डिग्री मधून चांगले करीअर घडेलच असे नाही, परंतु आपल्याला भरपूर ज्ञान मिळाले तर आपण निवडलेल्या संबंधित क्षेत्रात नक्कीच टाॅपवर जाऊ शकतो.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, दहावी बारावी पर्यंतच्या तुमच्या यशाच्या संघर्षाचे मनापासून कौतुक आहे. यानंतर यश मिळवतच रहाणे ही स्पर्धात्मक युगातील गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे यश हे अत्यंत उल्लेखनीय असल्याने त्यांच्या गुणगौरव सत्काराचा हा उपक्रम आम्ही गेली १० वर्षे हा उपक्रम आनंदाने राबवत आहोत. आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की आज वाहन चालक ते अगदी मैल मजूर अशा क्षेत्रात देखिल सर्व शाखांमधील पदवीधर आहेत त्यामुळे शैक्षणिक यश ही महत्वाची गरज आहेच. आता प्रशालेच्या बोर्डवर तुमचे नांव 'गुणवंत' म्हणून लागले आहे त्यामुळे तुमची यश प्राप्त करायची जबाबदारी वाढली आहे. यश मिळवण्याचे दडपण न घेता ते आपल्या चांगल्या भविष्यासाठी आहे त्यामुळे त्यासाठी आनंदाने परीश्रम करावेत असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. ए. आय. सारख्या क्षेत्रातील रोज आव्हानात्मक संधींचा देखिल विचार करणे व त्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आपल्याला जीवनात केवळ बघ्याची भूमिका घ्यायची नाही आहे तर विपरीत परिस्थितीमध्ये, सर्वांसाठी काहीतरी भरीव करायची वृत्ती आपल्यात सतत जागृत ठेवावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

यावेळी बोलताना शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर म्हणाले की तुम्हा गुणवंतांच्या यशाचा तुमच्या पालकांना जसा आनंद असतो तसा आमदार वैभव नाईक यांना आपल्या मतदार संघातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशाचा असीम आनंद होत असतो. 'आमदार वैभव नाईक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा', अशी त्यांची मुंबई व महाराष्ट्र राज्यात ओळख आहे कारण ते इथल्या सर्वांना आपलेसे वाटतात असे काम ते नेहमी करतात. भाई गोवेकर यांनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना सतत मेहनतीची तयारी ठेवण्याचे आवाहन केले व त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले की कोणतीही गोष्ट शिकणं हे फार महत्वाचं असतं. श्री देवी सरस्वती चरणी तुम्ही नतमस्तक झालात म्हणून हे यश मिळवले आहात. अगदी राजकारण क्षेत्रातही रोज काहीतरी शिकल्याशिवाय कोणीच टिकू शकत नाही. धाडसाने व प्रामाणिक चिकाटीने शिक्षण घेत रहायचा सल्लाही त्यांनी दिला. तुमचे हे उल्लेखनीय यश अत्यंत अभिनंदनीय आनंदाचे आहे असेही तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना नितीन वाळके म्हणाले की आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना सहजपणे द्यायची एक वृत्ती जी निर्माण झालेली आहे ती त्याच पाल्यांच्या पुढील वाटचालीसाठी घातक ठरत आहे. पालकांनी ह्या अशा गोष्टी करणे म्हणजे पाल्यांचे नुकसान आहे. या सत्काराच्या निमित्ताने हे आपण हे आज मुद्दाम सांगतोय कारण प्रत्येक पाल्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याला काय हवे आहे व त्याने निवडलेल्या मार्गावर त्याला मार्गदर्शन कसे उत्तम मिळेल हे पाहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की डाॅक्टर इंजिनिअर यांसोबतच आणखीन सर्व क्षेत्रातच तुम्ही सर्वोच्च क्रमांक मिळवू शकता. यासाठी आपल्याला माहीत नसलेल्या कोर्सेसची माहिती करुन घ्यावी व त्याची आपल्याला आवड लागू शकते की नाही यावर चर्चा मार्गदर्शन यांचा आधार घ्यावा. केवळ पालक सांगतात किंवा मित्र परीवार अमूक एक शैक्षणिक मार्ग निवडतात म्हणून तुम्ही सुद्धा तिच शैक्षणिक वाट निवडू नका. आपल्या शैक्षणिक आवडी विषयी पालकांशी नम्रपणे संवाद साधा आणि त्या आवडीच्या क्षेत्रात करीअरसाठी असे झोकून द्या की पालकांना त्याचे समाधान वाटेल. यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या सह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शिवसेना, युवासेना व युवतीसेनेचे पदाधिकारी नेहमी तुमच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील असा विश्वास मंदार ओरसकर यांनी उपस्थित गुणवंत व त्यांचे पालक यांना दिला

यावेळी बोलताना महिला तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांनी गुरुजनांचे जीवनातील स्थान महत्वाचे असल्याचे सांगितले. करीअर घडता घडता आपण माणुस म्हणून किती चांगले घडू शकतो हे ही शिकणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

यानंतर युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेक्षणिक जीवनात योग्यवेळी व निर्णय घेताना सारासार विचार करावा आणि त्याचसोबत आपण ज्या मातीत जन्मलो आहोत त्या मातीचे सर्वांगीण ॠण फेडणे हे सुद्धा महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते, नुकताच एका पर्यटकाचा जीव वाचवलेल्या मालवणातील कु. रुद्र गांवकर, कु. अंगद गांवकर, कु. वरद सापळे व कु. हर्ष कुबल या चार जलतरण पटूंचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे प्रशिक्षक श्री. प्रफुल्ल गवंडे उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक व युवासेना मालवण यांनी आयोजीत केलेल्या दहावी बारावीतील गुणवत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव या सत्कार कार्यक्रमाबद्दल उपस्थित गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी समाधान व्यक्त केले आणि आमदार वैभव नाईक व युवासेना मालवण, यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक यांची कन्या कु. नंदिनी वैभव नाईक विशेष उपस्थित होती.

सूत्रसंचालक अनंत पाटकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!