सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० हून अधिक वारकरी पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी सहभागी
देवगड | ब्युरो न्यूज : एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी देवगड (बापर्डे), कणकवली, वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कार्तिकी पायी वारीचे काल वैभववाडी येथून प्रस्थान झाले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार यांच्या निवासस्थानी श्रींच्या पादुकाचे विधिवत पूजन करुन हरिनामाच्या गजरात पालखी बैलगाडी रथात. महाराष्ट्र वारकरी महामंडळचे कोकण प्रांत अध्यक्ष ह.भ.प. भगवान कोकरे महाराज व सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते ठेवण्यात आली व दिंडीचे प्रस्थान झाले.
या कार्तिकी दिंडी मध्ये १५० हून अधिक वारकरी पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी सहभागी झाले. दिंडीसाठी मानाची बैलजोडी व अश्व राजेंद्र नारकर यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश सुतार, जिल्हा सचिव राजू राणे,खजिनदार मधुकर प्रभुगावकर,मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र पाटकर,अनिल पाळेकर,राजेश पडवळ,संजय नाईकधुरे,संजय गुरव व मोठ्या प्रमाणावर वारकरी उपस्थित होते.
( फोटो : साभार आंतरजाल)