23 C
Mālvan
Wednesday, December 18, 2024
IMG-20240531-WA0007

खासदार नारायण राणे यांचे मालवणात जल्लोषात स्वागत.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतर प्रथमच मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे, काल मालवणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे यांच्यासोबत सौ. निलमताई राणे उपस्थित होत्या.

यावेळी कुंभारमाठ येथे ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा ( भाजयुमो) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी खासदार नारायण राणे दाखल झाले आणि त्यावेळी मालवणातील व्यापारी, डॉक्टर तसेच अन्य नगरिक यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन केले. शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या पदाधिकारी यांनीही उपस्थित राहात खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतर प्रथमच मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे, काल मालवणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे यांच्यासोबत सौ. निलमताई राणे उपस्थित होत्या.

यावेळी कुंभारमाठ येथे ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा ( भाजयुमो) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी खासदार नारायण राणे दाखल झाले आणि त्यावेळी मालवणातील व्यापारी, डॉक्टर तसेच अन्य नगरिक यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन केले. शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या पदाधिकारी यांनीही उपस्थित राहात खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!