26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झाली नोकरीसाठी निवड..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल शाखेच्या २ तर इलेक्ट्राॅनिक्सच्या ११ विद्यार्थ्यांची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रोनिक्स ०१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा मोटर्स मध्ये इलेक्ट्रिकल २ इलेक्ट्राॅनिक्स ०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीई एविएशन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ०५ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मध्ये सिविल च्या ११ विद्यार्थ्यांची निवड आली. हिकव्हीजन कंपनी कडून इलेक्ट्रिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कर्मिस इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकल ०३ इलेक्ट्रोनिक्स-१० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या ०३ तर गंद्रीजल पुणे येथे इलेक्ट्रोनिक्सच्या ०६ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड झाली.

सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, फ्लश इलेक्ट्रोनिक्स, KSPG ऑटो, ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. संस्थेच्या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.

या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स बिभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल शाखेच्या २ तर इलेक्ट्राॅनिक्सच्या ११ विद्यार्थ्यांची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रोनिक्स ०१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा मोटर्स मध्ये इलेक्ट्रिकल २ इलेक्ट्राॅनिक्स ०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीई एविएशन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ०५ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मध्ये सिविल च्या ११ विद्यार्थ्यांची निवड आली. हिकव्हीजन कंपनी कडून इलेक्ट्रिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कर्मिस इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकल ०३ इलेक्ट्रोनिक्स-१० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या ०३ तर गंद्रीजल पुणे येथे इलेक्ट्रोनिक्सच्या ०६ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड झाली.

सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, फ्लश इलेक्ट्रोनिक्स, KSPG ऑटो, ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. संस्थेच्या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.

या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स बिभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करत आहेत.

error: Content is protected !!