माऊली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर व सहकारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींच्या पुढील वाटचालीसाठी दिल्या सदिच्छा.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील, इयत्ता दहावी परीक्षा २०२४ मध्ये, सेंट अर्सला स्कूल ची विद्यार्थिनी कु. खुशी किशोर चव्हाण हि ९० टक्के गुण मिळवून यशस्वी झाल्याबद्दल माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, संजय मालंडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले आणि कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी संजय राणे यांची कन्या कु. सुकन्या संजय राणे हिला ९७ टक्के गुण मिळवून यश प्राप्त केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिला गौरवण्यात आले.


यावेळी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. श्री व सौ किशोर चव्हाण, श्री व सौ संजय राणे, सुनिल काणेकर , भाई काणेकर, सुभाष उबाळे, बापू चव्हाण, विवेक मुंज, पंकज पेडणेकर आदि उपस्थित होते.
माऊली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर व सहकारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणा तसेच पुढील वाटचाली साठी सदिच्छा दिल्या.