24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

माझ्या घरावर दगडफेक झाली नाही कारण…

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई इंडिअन्सच्या खराब सांघिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार रोहीत शर्माचे भाष्य.

क्रीडा | ब्यूरो न्यूज : मुंबई इंडिअन्सचा माजी कर्णधार व
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या क्रिकेट विषयक ओढीबद्दल एक मिश्किल प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामध्ये एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आयुष्य कसे असते याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. एका क्रिकेटपटूकडे जेवढं यश, प्रसिद्धी आणि पैसा असतो तितकेच त्याचे जीवन आव्हानात्मक असते असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. एका परदेशी वृत्तवाहिनीला आयपीएलमधील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्माने वाईट कामगिरी झाल्यानंतर काय भोगावं लागतं यासदर्भात भाष्य केलं. त्याचवेळी त्याने केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहीत म्हणाला की, अपयशी सांघिक कामगिरीनंतर जेव्हा क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष आयुष्यात चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा करावा लागला होता. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या तत्कालीन दुबळ्या संघाकडून हरून पहिल्याच फेरीत भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. त्यावेळेस खेळाडूंविरोधात अगदी रस्त्यावर उतरुन चाहत्यांनी आंदोलन केले होते. काही क्रिकेटपटूंच्या घरांवर दगडफेकही झाली होती. त्यावेळेस त्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र या घटनेनंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा संताप दिसून आलेला नाही.

वाईट कामगिरी झाली तर आम्हाला चाहत्यांकडून अगदी दगडांचा माराही सहन करावा लागतो, असं रोहित म्हणाला. त्यानंतर तो मिश्किलपणे म्हणाला कि, ” माझ्या घरावर दगडफेक झाली नाही कारण आता आपल्या घरावर आता दगडफेक करणं शक्य नाही. लोक आता माझ्या घरावर दगडफेक करु शकणार नाही कारण मी आता फार उंच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहतो…!”

रोहीतने हे मिश्किलपणे व अत्यंत मजेशीरपणे सांगितले आणि मुलाखतीत तो पुढे म्हणाला की यशासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो पण अपयशानंतर, आपल्यावर प्रेम करणार्या चाहत्यांचा संतापही समजून घेऊन मानसिक दृष्ट्या कणखर रहाणे गरजेचे असते कारण क्रिकेट चाहत्यांच्या प्रेम व कौतुकामुळेच क्रिकेटर हा यशस्वी होत असतो.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई इंडिअन्सच्या खराब सांघिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार रोहीत शर्माचे भाष्य.

क्रीडा | ब्यूरो न्यूज : मुंबई इंडिअन्सचा माजी कर्णधार व
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या क्रिकेट विषयक ओढीबद्दल एक मिश्किल प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामध्ये एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आयुष्य कसे असते याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. एका क्रिकेटपटूकडे जेवढं यश, प्रसिद्धी आणि पैसा असतो तितकेच त्याचे जीवन आव्हानात्मक असते असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. एका परदेशी वृत्तवाहिनीला आयपीएलमधील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्माने वाईट कामगिरी झाल्यानंतर काय भोगावं लागतं यासदर्भात भाष्य केलं. त्याचवेळी त्याने केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहीत म्हणाला की, अपयशी सांघिक कामगिरीनंतर जेव्हा क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष आयुष्यात चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा करावा लागला होता. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या तत्कालीन दुबळ्या संघाकडून हरून पहिल्याच फेरीत भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. त्यावेळेस खेळाडूंविरोधात अगदी रस्त्यावर उतरुन चाहत्यांनी आंदोलन केले होते. काही क्रिकेटपटूंच्या घरांवर दगडफेकही झाली होती. त्यावेळेस त्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र या घटनेनंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा संताप दिसून आलेला नाही.

वाईट कामगिरी झाली तर आम्हाला चाहत्यांकडून अगदी दगडांचा माराही सहन करावा लागतो, असं रोहित म्हणाला. त्यानंतर तो मिश्किलपणे म्हणाला कि, " माझ्या घरावर दगडफेक झाली नाही कारण आता आपल्या घरावर आता दगडफेक करणं शक्य नाही. लोक आता माझ्या घरावर दगडफेक करु शकणार नाही कारण मी आता फार उंच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर राहतो…!"

रोहीतने हे मिश्किलपणे व अत्यंत मजेशीरपणे सांगितले आणि मुलाखतीत तो पुढे म्हणाला की यशासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो पण अपयशानंतर, आपल्यावर प्रेम करणार्या चाहत्यांचा संतापही समजून घेऊन मानसिक दृष्ट्या कणखर रहाणे गरजेचे असते कारण क्रिकेट चाहत्यांच्या प्रेम व कौतुकामुळेच क्रिकेटर हा यशस्वी होत असतो.

error: Content is protected !!