कणकवली | उमेश परब : कलमठ येथील संदीप मेस्त्री मित्रमंडळामार्फत कलमठ येथे आयोजित केलेल्या नरकासुर स्पर्धेत कलमठ कोष्टीवाडी येथील इसवटी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळ यांनी तर तृतीय क्रमांक सुतारवाडी येथील पिंपळपार मित्रमंडळाने प्राप्त केला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गोरक्षनाथ मित्रमंडळ गोसावीवाडी, जय हनुमान गावडेवाडी आणि बाजारपेठ येथील ओंकार मित्रमंडळाचा सन्माम करण्यात आला. या स्पर्धेत एकूण आठ मंडळांनी सहभाग घेतला होता. विजेत्या मंडळांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, स्पर्धा आयोजक संदिप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, सुरेश वर्देकर, गिरिष धुमाळे, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, आबा मेस्त्री, नीळकंठ हजारे, जगदीश राउत, सुनील रेपाळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक व प्रसिद्ध मूर्तिकार समीर गुरव यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समीर कवठनकर, अमेय मडव, नितेश मेस्त्री, बाबू हिंदळेकर, धीरज मेस्त्री, परेश कांबळी, प्रथमेश कळसुळकर, यांनी मेहनत घेतली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -