कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे हायमास्ट तथा पथदीप बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. हळवल फाटा येथील वळण हे अपघात प्रवण क्षेत्र आहे. फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. रात्रीच्यावेळी याठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात झाले आहेत. सरपटणारे प्राणी, मोकाट मुके जीव यांचाही या परिसरात वावर आहे. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे नितांत गरजेचे आहे. स्ट्रीट लाईट बसविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानंतर याठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही झाली होती. मात्र, अद्यापही या ठिकाणी स्ट्रील लाईट लावण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -