चिंदर | विवेक परब : भगीरथ़ प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या कार्यालयामध्ये आकाशकंदील स्पर्धा संपन्न झाली. यास्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. निसर्गामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करून मुलांनी आकाश कंदील बनविले. आकाशकंदील स्पर्धेमध्ये श्री. जनार्दन खोत व श्री. बाळ पालव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यास्पर्धेत चिंदर येथील नारायण संजय पाताडे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. माडाच्या झावळाच्या पातीचा उपयोग करुन बनवलेल्या पाताडे यांच्या आकाश कंदिलाचा या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक आला.
प्रथम क्रमांक–मिताली खोत-आडेली, व्दितीय क्रमांक–कुणाल मयेकर-झाराप, तृतीय क्रमांक–वर्षा जाधव-तृतीय क्रमांक मिळाला, त्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुलांनी आकाश कंदील बनवताना त्याची रंगसंगती कशी असावी, कोणते पर्यावरणपूरक साहित्य वापरावे, आकार कोणता असावा यासाठी “आकाश कंदिल कसा असावा” या विषयाची एकदिवशीय कार्यशाळा घेण्याचे ठरवण्यात आले. उपस्थितांचे व स्पर्धकांचे आभार भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅक्टर प्रसाद देवधर यांनी मानले.