कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील नगर वाचनालय, कणकवली येथे शनिवार दिनांक १८ मे, २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत, मराठी गझलच्या प्रचार प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न होत आहे.
गझल नवाज भीमराव पांचाळे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार असून या कार्यशाळेत गझल लेखनाच्या आकृती बंधाबद्दल प्राथमिक स्वरूपाचे धडे देण्यात येतील. ज्येष्ठ गझलकार श्री देविदास पाटील, रत्नागिरी हे देखील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.
कणकवली आणि परिसरातील गझल लेखन आणि गायनामध्ये रुची असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन आणि सायंकाळच्या चहा बिस्किटाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शैलजा कदम – 8805292596, तसेच विनायक सापळे – 9404940217 यांच्याकडे नोंदवावित अशी माहिती आयोजकां तर्फे नामानंद मोडक (अध्यक्ष – अखंड लोकमंच सिंधुदुर्ग) यांच्या वतीने करण्यात येत आहे.